Translate

Thursday, July 24, 2014

महाराष्ट्र सदन दिल्ली छगन भुजबळांचे हे लाडके अपत्य

उभारणीच्या काळा पासूनच सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छगन भुजबळांचे हे लाडके अपत्य रागाच्या भावनेच्या भरात झालेल्या प्रकरणात आणखी वादात सापडले आहे . त्याचा राजकीय गैरफायदा घेण्यात आपले बेईमान राजकारणी टपलेलेच असतात आणि तेच झाले .
आता तर वादात पाकिस्तानातून मुंबई हल्ल्याचा मास्‍टरमाइंड हाफिज सईद याने ही उडी मारली आहे . मतांचे राजकारण जोरात सुरु आहे .
 महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रीयन जेवण मिळावे ही मागणी नक्कीच गैरवाजवी नाही . आणि या सदनात महाराष्ट्रीयन माणसा पेक्षा up , बिहार च्या लोकाची जास्त बडदास्त ठेवली जात होती , नवीन महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त बिपीन मलिक खासदारांना जाणीवपूर्वक वाईट वागणूक देतात मलिक यांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन आहे . हा विषय एक महिन्या पासून पेटलेला होताच त्यात ही ठिणगी आणि आग जास्तच भडकली . समोर विधान सभेच्या निवडणुका आहेत त्या डोळ्या समोर ठेऊन प्रत्येकजण आपली पोळी भाजून घेईल .

No comments: