Translate

Sunday, April 14, 2013

निर्लज्ज समर्थन.....

लक्ष्मण माने कार्याध्यक्ष शारदाबाई पवार आश्रम शाळा … माजी आमदार, साहित्यिक लक्ष्मण माने  याने नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप सात महिलांनी केला. त्या नंतर लक्ष्मण माने १५  दीवस फरार होता …पोलिसांना सापडत नव्हता  … हा लक्ष्मण माने म्हणजे एक धंदेवाईक राजकारणी आहे ; हे साताऱ्यात सर्व जनतेला माहीत आहे . या सर्व गोंधळात असे धंदेवाईक राजकारणी दिल्ली पासून ओसाड गावच्या गल्ली पर्यंत पसरलेले आहेत; या कडे मात्र सफाईदार पणे दुर्लक्ष केले गेले. वास्तविक पाहतां या गोष्टीवर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे…….

बड्या राजकारण्याच्या नावाने, त्यांच्या नातलगांच्या नावाने आश्रम शाळा , वृद्धाश्रमा पासून ते झोपडपट्ट्या  बेकायदेशीर पणे उभ्या करायच्या , NGO ट्रस्ट करून संस्था स्थापन करायच्या आणि सेवेच्या नावा खाली मेवा खायचा …, वर्षाला एक दोन समारंभ करून त्यात जिल्हाधिकाऱ्या पासून पोलीस अधिकारी वरिष्ठ  शासकीय अधिकारी आणि संबंधित  वरिष्ठ राजकीय नेत्यांचा सत्कार उदो उदो करावयाचा त्याना नजराणे द्यायचे आणि मिडीयाला हाताशी धरून या कार्यक्रमाच्या पानभर पेड जाहिरातीच्या माध्यमातून बातम्या द्यायच्या हा प्रकार देशात राजरोस चालू आहे. राज्यकर्तेही हा प्रकार माहीत असून ही मतांच्या लाचारी साठी खपवून घेतात. आपल्या आई च्या नावाने सुरु असलेल्या माने याच्या आश्रम शाळेत काय धंदे चालतात हे पवार सारख्या मुरब्बी राजकारण्याना माहीत नव्हते या वर कोणी विश्वास ठेवणार नाही . गांधी नेहरू खानदानच्या नावाने प्रत्येक गावातील सरकारी जागेवर  गल्ली बोळात उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपडपट्याना त्यातील मवाली गुंडाना स्थानिक राजकारण्याचा वरदहस्त असतो हे उघड गुपित झाले आहे…. एखादे वेळी कार्यवाई झालीच तर मानवतावादा च्या नावाने गळे काढायला हे नेते तयारच असतात.
‘तू माङयाशी बायकोप्रमाणो वाग, तुझा पगार वाढवतो, तुला कायम करतो,’ असे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांनी हा अत्याचार केल्याचे या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे तर स्वतः लक्ष्मण माने यांनी पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर बोलताना की मी बलात्कार करण्यासाठी लायक नसतानाही खोटे आरोप करून माझ्यावरच बलात्कार केला जात आहे. एकंदरीत अवघडच आहे. लक्ष्मण माने वर जो पर्यंत गुन्हा शाबित होत नाही तो पर्यंत त्याला गुन्हेगार म्हणू नये…. या तक्रारदार स्त्रिया इतकी वर्षे अत्याचार का ? सहन करत होत्या …. आताच का आरोप होत आहेत ? माने याला बदनाम करण्याचा हा डाव आहे , अश्या तऱ्हेने युक्तिवाद करून माने हा निर्दोष आहे असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. 
पण एकंदरीत या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या समाज संस्थांचा संशयित कारभार पाहता स्त्रियांचे आरोप, हे कट कारस्थानाचा भाग आहे यावर विश्वास बसणे मात्र कठीण आहे. शरीर संबंध हा दोघांच्या स्वखुषीचा मामंला होता पण  आर्थिक व्यवहार फिस्कटल्या मुळे स्त्रियां हा आरोप करत आहेत हे जर मान्य केले तर हा  अधिक भयानक प्रकार आहे. आर्थिक आमिष दाखवून स्त्रियांचा उपभोग करावयाचा आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करावयाचे हे घातक आहे.  

No comments: