Translate

Sunday, April 21, 2013

हि सुरक्षा व्यवस्था कि मुकेश अंबानी यांच्या वर सरकार ची पाळत

हि सुरक्षा व्यवस्था कि मुकेश अंबानी यांच्या वर सरकार ची पाळत . २०१४ ची निवडणुका जवळ येत आहे या करता कॉंग्रेसला  कांही दगाफटका मुकेश कडून होऊ नये या बाबत सरकारची ही काळजी तर नव्हे. 
 
मुकेश यांचे स्वतःचे असे कमॉनडोज सुरक्षा रक्षकांचे अभेद्द जाळे असताना आणि ते सुरक्षा व्यवस्थेवर कोट्यावधी खर्च करू शकत असताना सरकारला हा खर्च करण्याची का  आवश्यकता भासली????  ….
 
देशात टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, प्रेमजी अझीज , गोदरेज, राहुल बजाज  यांच्या सारखे हजारो उद्योगपती आहेत पण ते कधी अंबानी बंधू सारखे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरताना दिसत नाही …। मग या अंबानी बंधुनाच एव्हढ्या मोठ्या सुरक्षा जाळ्याची काय आवश्यकता??????…
इंडियात हजारो महिला अत्याचाराला बळी पडत असताना त्याना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राजधानी दिल्ली तर बलात्काराची राजधानी झालेली आहे 

…। सामान्य जनता या अत्याचारा विरुद्ध कोणाच्या ही भडकावण्या शिवाय रस्त्यावर उतरत आहे. त्या जनतेला सुरक्षिततेचा दिलासा देण्या ऐवजी त्यांच्या वरच लाठीमार होत आहे. अश्या वाईट अवस्थेत जनतेला सुरक्षा पुरवण्या ऐवजी अंबानीला सुरक्षा व्यवस्था देण्यात गृहमंत्रालय मग्न आहे. भारतात  १०० दीडशे वर्षे उद्योगात असणाऱ्यानां  कधी धमकीची पत्रे आली नाही ती अंबानी यांनाच कशी येतात???
  

रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. झेड' दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत अंबानी हे मुंबई शहर आणि शहराबाहेर फिरत असताना चोवीस तास त्यांच्याभोवती सीआरपीएफचे कमांडो राहतील. शिवाय अंबानी यांच्या वाहनापुढे कमांडोंचे एक पायलट वाहन असेल आणि एक सशस्त्र कमांडोंचे पथक मागे राहणार आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19664528.cms

No comments: