भारत कधी कधी माझा देश आहे......
सर,
लहानपणी शाळेत ग्राउंड वर जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत-भाग्य-विधाता या
राष्ट्रगीता नंतर भारत माझा देश आहे ही प्रतीज्ञा म्हणताना छाती अभिमानाने
भरून यावयाची देशा बद्दल गर्व वाटायचा .....कांही वात्रट विद्यार्थी सारे
भारतीय माझे बांधव आहे म्हणताना हळुच एक सोडून म्हणत तेंव्हा आजूबाजूंच्या
विद्यार्थ्याना हसू आवरत नसे...........हळूहळू काळ बदलत गेला. रामदास
फुटाणे यांची भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत.
माझा जयजयकार असो, माझ्या धर्माचा जयजयकार असो, माझ्या पंथाचा जयजयकार
असो,माझ्या प्रांताचा जयजयकार असो. झालाच तर... कधी कधी... माझ्या देशाचा
सुद्धा जयजयकार असो.-रामदास फुटाणें ही वात्रटीका वाचनात आली...... जे न
देखे रवी ते देखे कवी या म्हणीची प्रचीती आली.....खरच फुटाणे यांनी देशाच
कीती सार्थ वर्णन केल...आणि आजची देशाची भयानक दुरवस्था पाहता शाळेतल्या
प्रतीज्ञे चा पोकळपणा जाणवतो आणि रामदास म्हणतात तेच पटते ...कधी कधी भारत
माझा देश आहे.......अखेरीस ....जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्र गीत
इंग्लंडचा बादशहा जार्ज पंचम याच्या १९११ च्या भारत भेटीच्या वेळी त्याचे
स्वागत करण्याकरता त्याचे गुणगान गाण्या साठी खास लीहले गेले होते हा कटु
सत्य असलेला इतिहास समजल्यावर आणि स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी वंदे मातरम गीता ला डावलुन या जन-गण-मन
गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याकरता जे घाणरडे राजकारण खेळले गेले ते
समजल्यावर तर या राष्ट्रगीताचा सुद्धा तिटकारा वाटायला
लागला............बऱ्याच वर्षांनी प्रतीज्ञा वाचल्यावर मनावरच्या जखमेतून
अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे भळभळून रक्त वाहू लागल्याने प्रतिक्रया मोठी
झाले.
1 comment:
माझी जन्मभूमी सोडून पैलतीर गाठण्याच्या मागे असलेल्या अनेक कारणात एक कारण आपण येथे मांडले . धन्यवाद
Post a Comment