Translate

Saturday, July 28, 2012

छे छे DNA FNA हा सगळा फालतूपणा आहे......


आम आदमी की तीखी आलोचना  के साथ ही राजकीय नेतावों ने भी इस फैसले पर अपनी अपनी राय अपने हिसाब से दी.

स्वर्गात बापू जवाहर ला म्हणाले, पहा जवाहर पक्ष कार्यकर्त्यान चे नैतिक अधपतन......केलेल्या पापांची जबाबदारी स्वीकारण्याची माझ्या सारखी यांची नैतिक हिम्मत नाही....या मुळेच  मी तुम्हा सर्वांना कॉंग्रेस पक्ष बरखास्त करण्याचे आवाहन केले होते पण माझे कोणी ऐकले नाही....भोगा आता आपल्या कार्यकर्त्यांच्या पापाची फळे.....

thanks god !!! माझ्या वेळी हे DNA चाचणी प्रकरण नव्हते नाही तर माझी कीती पंचाईत झाली असती एव्हढेच चाचा नेहरू बापूला ऐकु जाईल न जाईल अश्या तऱ्हेने पुटपुटले...

स्वर्गात मराठा मध्ये आचार्य अत्रे गरजले , गेल्या दहा हज्जार वर्षात असे पाप कोणी केले नाही चाबकाने फोडून काढा त्या तिवारीची पाठ म्हणजे पुढच्या दहा हजार वर्षात असले पाप करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.


Wednesday, July 25, 2012

हिटलर ने पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान मिळवुन दिले"



हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.

मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-:

1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोव...्हाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले.
2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला.


Wednesday, July 18, 2012

रिकामे स्टेडियम हाच पाकिस्तानचा धिक्कार ........

या देशात देशहिताचा हा आवाज ........फक्त मराठी माणूसच उठवू शकतो ........पाक क्रिकेट संघाला क्रिकेट प्रेमी खेळाडू असून हि आधी सुनील गावस्कर यांनी विरोध केला ....आता बाळासाहेब ......' संपूर्ण देश पाकिस्तानच्या विरोधात असताना ज्या क्रिकेट बोर्डानं पाकड्यांना भारतात आमंत्रित केलं ; त्या क्रिकेट बोर्डाला मुंबईच्या ताज हॉटेलसमोर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चाबकाने फोडून काढलं पाहिजे ',...भारतात स्फोट घडवून आणणा-या पाकड्यांशी शांतीवार्ता करणे हे ढोंग आहे व क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोह आहे. क्रिकेट बोर्ड पैशाला चटावले आहे व पैशांसाठी देशाची सुरक्षा व इज्जतीचा बाजार मांडायलाही तयार झाले आहे. इतके निर्लज्ज व भयंकर लोक ज्या देशात आहेत त्या देशाचे पाकिस्तान व्हायला कितीसा वेळ लागणार ?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.  
पाकिस्तानसोबतच्या मालिकेला विरोध करणा-या लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं त्यांनी अभिनंदन केलंय. क्रिकेट बोर्डाचा राष्ट्रद्रोही मुखवटा फाडून गावस्करांनी शंभर कोटी देशवासीयांच्या भावनेला तोंड फोडलं आहे. पाकिस्तानशी क्रिकेट नको तर युद्ध हवे हीच देशवासीयांची भावना आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची धमक काँग्रेस आघाडी सरकारमध्ये नाही. शिवसेना काय करायचे ते करीलच , पण ' २६/११ ' ची वेदना शिल्लक असेल , राष्ट्राभिमानाची ज्योत पेटली असेल , तर एकही क्रिकेटवेडा पाकिस्तानचा सामना बघायला स्टेडियमवर जाणार नाही. रिकामे स्टेडियम हाच पाकिस्तानचा धिक्कार आणि ' २६/११ ' च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल , अशी भावनिक सादही बाळासाहेबांनी घातली आहे.
म्हणूनच दिल्ही चा महाराष्ट्रा बद्दल कायम राग आहे......नेहरू  तर शिवाजी द्वेष्टे होतेच पण त्यांच्या पुढील वारसांनी सुद्धा महाराष्ट्रीय नेतृत्व खच्ची करण्याचा कायम प्रयत्न केला...आता हे सर्व गळे काढत क्रिकेट आणि दहाषदवाद यात सरमिसळ करू नका खेळला खेळ म्हणून बघा....दुश्मनीचे रंग भरू नका म्हणत नार्काश्रू ढालतील........

आनंद मरते नहीं.........

जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहाँपनाह, उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बंधी है. कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है. हाः, हाह, हाह, हाह हा........" आनंद मरते नहीं.........

Tuesday, July 17, 2012

मराठीच्या मुद्या पाठोपाठ ......उद्धव च्या आजारपणाचा मुद्दा ही राज.......

...........बाकी कांही ही म्हणा मराठीच्या मुद्या पाठोपाठ  ......उद्धव च्या आजारपणाचा मुद्दा ही  राज ठाकरेने मोठ्या शिताफीने पळवला.......आणि मिडिया उद्धव च्या आन्जिओग्राफ़ि पेक्षा राज च्या रक्ताच्या नात्या भोवतीच फीरत राहिला......राज ला समजताच त्याने अलिबागचा दौरा अचानक कसा रद्द केला?????....त्याच्या गाड्या चा ताफा लीलावातीला कसा पोहंचला?????......राज च्या घराचे सगळे कसे तत्परतेने जिव्हाळ्याने लीलावातीला पोहोंचले????.......राज ने उद्धवला कसा धीर दिला??????....डॉक्टरा कडे उद्धवच्या प्रकृतीची कशी चोकशी केली.......घरी जाताना राजने स्वतः 'अस्वस्थ' उद्धवच्या  गाडीचे कसे सारथ्य केले.....या दोघांचे मातोश्री वर बाळासाहेब यांच्या बरोबर  काफीपान ..... या दोघांच्या भेटीने पक्षातील कार्यकर्त्यांची हृदयाची धडधड कशी वाढली......पक्ष सोडल्या पासून यांनी एकमेकांवर केलेली टीका....'मराठी'जनांचे चेहरे कसे खुलले !......कीती वर्षांनी हे एकमेकांना भेटत आहेत..... यातून कोणातही रायकीय अर्थ काढू नये,.....म्हणत मिडिया राज उद्धव च्या एकत्रीकरणाच्या राजकारणा भोवतीच फिरत राहिला.......या सगळ्यात बिचाऱ्या उद्धवची छाती दुखी मात्र साइड ट्रक वर फेकली गेली........आंता मिडिया नवीन समीकरणाचे  गुऱ्हाळ मनसे-शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस  नेत्यांच्या बरोबरीने  घालण्यास मोकळे झाले..... जय महाराष्ट्रा जय मराठी माणूस.....

Thursday, July 5, 2012

http://www.youtube.com/watch?v=oYWJGdZG-wg&feature=fvwrel रामदेव बाबा ........जेव्हढे समर्थक तेव्हढेच दुश्मन...ज्ञानेश्वर यांनी ८०० वर्षापूर्वी गीता सामान्य माणसाच्या भाषेत मराठीत लिहून क्रांती केली अनेक कर्मठ सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला......पण सामान्य माणसाचे हित रक्षण केले.

तेच रामदेव बाबांच्या योगांच्या प्रसार कार्याचे महत्व आहे......आज पर्यंत मुठभर लोकांची मक्तेदारी असलेला योगा रामदेव बाबांनी आम आदमी करता सहज सोप्पा करून सांगितला ......जग भर लोक योगा करू लागले ....या मुळे योगाची मक्तेदारी असलेला वर्ग बाबांवर टीका करू लागला......योगा असा शिकत नसतात ....त्यातील गांभीर्य पावित्र्य बाबांनी घालवले........त्यास सडक छाप बनविले.....वगैरे वगैरे......पण या टीकेचा आम जनतेवर फारसा परिणाम झाला नाही.....आणि योगाचे वर्ग हजारो जनतेच्या साक्षीने भरू लागलेत....ज्यांना या शिबिरात भरती होणे परवडणारे नव्हते ते लोक .......... भल्या पहाटे उठून TV समोर बसून योगा करणे चालू केले......याला पुरातन योग गुरुनी नाके मुरडली........पण जनता मात्र योगाचा फायदा घेवू लागली......या पुरातन योग गुरु च्या मतां कडे जनतेने चक्क दुर्लक्ष केले........जो योग हस्तीदंती मनोऱ्यात कैद होता विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होता तो योगा आता झोपडपट्टीत सुद्धा सर्वांगानी फुलला........रामदेवबाबांनी एक इतिहास रचला एव्हढे मात्र त्यांच्या टीकाकारांना मान्य करावेच लागेल.....

Sunday, July 1, 2012

सर्वच दहाषदवादी......यांना क्रांतिकारक म्हणून मान दिला जाईल..

भारतीय स्वातंत्र लढ्यातील क्रांतीकारक कोण ? असा प्रश्न विचारल्यास चौथीत शिकणा - या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण भगतसिंग , सुखदेव , राजगुरू सावरकर , सुभाषचंद्र बोस आणि इतिहासातील अनेक शूर स्वातंत्रसेनानींची नावे पटापट सांगतील . .............................
.............................................
पण जर कोणी दहशतवादी अफजल गुरुचे या यादीत नाव घेतले तर तुमच्या तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल नाही का ? पण हा प्रकार झाला आहे . गूगलवरुन अफझलची ओळख भारतीय क्रांतीकारक अशा स्वरुपात जगाला करुन दिली जात आहे ...........इतर वेळी लहासहान करणा करीता नेट  वर बंदी आणावयाची भाषा करणाऱ्या काँग्रेसी सरकारला हा हलकट दहाषदवाद्यांना, अंतकवाद्यांना संसदेवर हल्ला करणाऱ्याना भारतीय क्रांतिकारक म्हणून मानाचे स्थान देंण्याचा अपप्रचार दिसत नाही का?????? हा प्रकार त्वरित बंद करावा म्हणून वाचकांनी गुगलने हा फोटो या सर्च रिझल्टस मधून काढून टाकावा यासाठी  https://www.google.com/webmasters/tools/removals?hl=en या लिंकवर क्लिक करुन विनंती पाठवू शकता .नुसती विनंती करू नका तर धमकी द्या....असा हलकट प्रचार फक्त मेरा भारत महान असणाऱ्या देशातच होऊ शकतो ..नुसते LIKE करू नका तर यास मनापासून वरील लिंक वर निषेध करा ...मते मांडा...............नाही तर एक दिवस कसाब, हाफिज सईद,  झबीहुद्दीन अन्सारी ऊर्फ झबी , मोहम्मद सिद्दिकी,जुंदाल,मीर ,अबू हमजा,रियाझ आणि यासिन भटकळ , ‘लष्कर-ए-तय्यबा’.इंडियन मुजाहिद्दीन.च्या  संघटनेतील          सर्वच दहाषदवादी......यांना क्रांतिकारक म्हणून मान दिला जाईल..