Translate

Tuesday, February 7, 2012

नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति तुकाराम महाराज

देशभरातूनच नव्हे; तर जगभरातून युवराज च्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्याच्या चाहत्या कडून होमहवन यज्ञ करण्यात येत असून या यज्ञा होमहवना मुळे युवराज लवकर बरा होईल अशी त्याच्या चाहत्यांची अंधश्रद्धा आहे. नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति तुकाराम महाराज सांगून गेलेत. त्याच धरतीवर म्हणावसे वाटते नवसे होमहवने तब्ब्येत दुरुस्त होती I मग का कारणे लागे वैद्यक शास्त्र. पण....आपण सुधरू शकत नाही.... हेच खरे
देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबांनो. तीर्थक्षेत्रे, जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुलभुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढीमिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा.प्रबोधनकार ठाकरे यांनी १०० वर्षा पूर्वी सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी. असे आपले वागणे आहे.

Navnath Pawar यातले कोणीही देवाला मनापासून मानणारे नाहीत. त्यांचा देवावर आजिबात विश्वास नाही. खरे देवभक्त कट्टर कर्मवादी आणि खंबीर असतात. बऱ्यावाईटाची चिंता देवावर सोडून कामावर चित्त एकाग्र करणे ही त्यांची भक्ती असते. "कांदा मुळा भाजी , अवघी विठाबाई माझी" म्हणेल, आणि कामात मग्न राहील तो खरा देवाचा भक्त.... हे सगळे भगत... यांना चमकोगिरी करून स्वार्थ साधायचा असतो..
Ujwal Godbole काही गोष्टी अश्या आहेत त्या होण्यासाठी अजून सुद्धा ४०,५० वर्षे जावी लागतील.परंतु आशा पे दुनिया कायम है!असे म्हणतात ते खरे असे असावे.माणसाच्या मनात आशा नसेल तर एक मोठी पोकळी निर्माण होते,तेव्हा त्याला अश्या एका अद्भूत गोष्टीची आवशकता असते कि त्याच्या जोरावर तो त्याच्यावर आलेला कठीण काळ पार करू शकेल.शेवटी आपण म्हणतोच कि जे काही होणार आहे ते चुकणार नाही.समजा आपल्या घरातील कुणाला तरी कॅन्सर आहे तो माणूस कामाला जाईल आपली इतर कामे करेल पण त्याच्या डोक्यात सतत हाच विचार राहील कि आपला माणूस आजारी आहे आणि तो बारा कसा होईल.आत्ताच्या काळात तो नक्की पहिल्यांदा डॉक्टर कडे जाईल.म्हणजे पहिल्यांदा तो नक्कीच official मार्ग अनुसरून पाहिलं,पण सगळे करून थकल्यानतर तो अगदी बुवा,बाबा कडे जाईल.१०% जे काही होईल ते होईल म्हणून as it is behave करतील पण ९०% लोकांचे तसे नाही.(मी स्वतः देव,बुवा भानगडी मानत नाही,त्यामुळे मला सुद्धा हा सगळा मुर्खपणा वाटतो.)
Chaitanya Tamhankar युवराज आजारी आहे याचे दु:ख आहेच ... पण त्याचे आजारपण ही त्याची स्वत:ची समस्या आहे... त्या आजाराचे इतके अवडंब माजवणे ( Headline in Times of India ??? ) याचे सुद्धा तितकेच दु:ख आहे.
सोनिया गांधीने सुद्धा कर्करोगावर उपचार करून घेतले ... पण ते कसे केले याची कुठेही वाच्यता नाही.... मी कितीही सोनियांच्वर टीका करत असलो तरी ... १०० % मार्क.... यां बाबतीत देतो.
एका उमदा खेळाडूला... ते सुद्धा ज्याच्यामुळे world cup मिळाला तो गमावणे हे आपल्या सर्वांनाच फारच क्लेशकारक. पण आपण प्रत्येक क्लेशकारक घटना लोकांपुढे नेतो काय ?
मग युवराज च्या बाबतीत हे hype / blow up का केले जाते ?
खरे दु:ख झाले आहे ते त्याच्या sponsorers ना ... त्याला वेगवेगळ्या प्रकारे दिले गेलेले पैसे कसे वसूल होणार ? त्यांचा लोगो कसा लोकांपुढे येणार याचीच चिंता आहे.
त्यासाठी paid news पसरवून... त्याबद्दलची माहिती पसरवून त्याची brand image / value कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
.आता औषध कंपन्या पण यात सामील होतील व कोणती औषधे ... कशी दिली त्याची रसभरीत वर्णन छापून येतील... व ती औशाधे चढ्या भावात भारतात विकली जातील. ..... याच औषध कंपन्या ती नावे छापून आणण्या साठी मदत घेतील ती त्या sponsorers चीच.
शिवाय ... इथली मुर्ख मंडळी ... कोणता दगड / रत्न गळ्यात / चड्डीत ठेवल्याने कोणता कर्करोग बरा होतो याचे TV वर कार्यक्रम करतील ... त्या वेळच्या होणार्या जाहिरातीतून .... sponsorers पैसा वसूल करतील ... व ... नंतरच हे सर्व थंड होईल.
उरली सुरली मुर्ख माणसे ... मी युवराज वर किती प्रेम करतो ते दाखवण्या साठी उपास तापास करतील ..... लोकल लीडर्स ... होम हवन यज्ञ करतील ... त्यांची चर्चा होईल , publicity मिळेल पण ....पैसे काही मिळणार नाहीत

No comments: