विधान सौंध बंगलोर कर्नाटक राज्याचे विधी मंडळ....... शासनाचे कामकाज चालू
असताना त्यात सहभाग घ्यायचा, जनतेच्या अडी अडचणी सोडवायच्या कायदे
करावयाचे ही कामे करायची सोडून ३ मंत्री महोदय मोबाईल वर चक्क ब्लू
फिल्म पाहत बसले ...... आणि पकडले गेलेत.....भाजपचे मंत्री लक्ष्मण सावडी,
महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री सी. सी.
पाटील यांनी विधानसभेत अश्लील चित्रफीत पाहिल्याचे वृत्त एका प्रादेशिक
वृत्त वाहिनीने सर्वप्रथम प्रसारित केले होते.
विजापूर
जिल्ह्यातील
सिंदगी
शहरात
पाकिस्तानचा
ध्वज
फडकवल्याप्रकरणी
आणि
उप्पीनंगडी
येथे
निर्माण
झालेल्या
जातीय
तणावावर
विधानसभेत
चर्चा
सुरू
असताना
हे
दोन
मंत्री
या
‘
कामा
’
त
गुंग
होते.......
पाकिस्तान देशाच्या
ध्वजारोहणासारख्या एका गंभीर विषयावर चर्चा सुरू
असताना सावडी आणि पाटील
चित्रफीत बघत असल्याची व्हीडिओ क्लिपच या वाहिनीने प्रसारित केली .
त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली ......... सामान्य माणूस दोन घटका
मनोरंजना साठी अशी फिल्म पाहताना पकडला गेला तर The punishment for an
offence under section 67 of the IT Act is on
first conviction with imprisonment (simple or rigorous) for a term which
may extend to five years, and with fine which may extend to one lakh
rupees, and in the event of a second or subsequent convictions, with
imprisonment (simple or rigorous) for a term which may extend to ten
years, and also with fine which may extend to two lakh rupees. आणि
मंत्री महोदय फक्त मंत्री पदाचा राजीनामा देऊन मोकळे झालेत. विशेष म्हणजे एक मंत्री महोदय महिला
व
बालकल्याण विभागाचे आहेत........ महिलांचे हे मंत्री महोदय काय कल्याण
करणार हे पार्टी विथ डिफरन्स म्हणून तोरा मिरवणारा भाजप पक्षच जाणे.....
जॉर्ज ऑरवेलच्या
‘ अनिमल फार्म’ या अजरामर कादंबरीत समाजातील शासक डुकरे अशीच चलाखी करतात.
‘सर्व प्राणी समान आहेत.’ या ठरलेल्या तत्वाला पुस्ती जोडतात की ‘काही
प्राणी’ अधिक समान आहेत? मग काय वाटेल ते करता येते....आज इंडिया मधील
भ्रष्ट्र , बेईमान आणि आता कामलोलूप लोकप्रतिनिधी नी सर्व जनता समान आहे ,
'कायद्या पुढे सर्व समान आहेत'......सर्वधर्म समभाव म्हणत ऑरवेलने म्हंटल्या प्रमाणे
आपल्या
देशातही कायद्या पुढे काही लोक विशेष समान आहेत , असे वागणे सुरु ठेवले आहे. काहींचे तर परिवारच्या
परिवार विशेष समान आहेत! . काही परिवारांचा देशाच्या सत्तेवर जन्मजात हक्क
असतो. या देशात एखाद्या सामान्य माणसाच्या हातून कायदेभंग झाला किंवा
दुर्लक्षित
करण्याजोगा क्षुल्लक गुन्हा घडला तरी पोलिसासाठी त्याच्यावर हुकूमत
गाजविन्याची,त्याच्यावर अत्याचार करण्याची पर्वणीच असते. अशा व्यक्तीला ते
बिनदिक्कत मध्य रात्री त्याच्या घराचा दरवाजा तोडून ताब्यात घेतात. पण काही
व्यक्तींच्या बाबतीत पोलीस कमालीचे असहाय्य असतात. त्यानी कायद्याला व
देशाच्या संविधानाला आव्हान दिले तरी पोलीस त्यांच्याशी किती अदबीने आणि
नम्रतेने वागतात याची अनेक उदाहरणे देता येतील. इंडिया मधील न्यायालय
सुद्धा कांही जण अधिक समान आहेत अशी वागतात.....
भांडवलशाही व समाजवादी
राज्य शासक असो व लोकशाही मधील जनतेने निवडून दिलेले शासनकर्ते असोत... एकदा
ते शासक झाले की सामान्य जनते पेक्षा ते अधिक समान असतात आणि मग ते
बेकायदेशीर कामे ही करतात कारण ते अधिक समान असतात.....पण एक दीवस सामान्य
माणसे पेटून जेंव्हा उठाव करतील तेंव्हा यांना पळता भुई थोडी होईल..... आता
म्हणे या प्रकरणाची चौकशी होणार..... काय चौकशी होणार .....हे जनतेला
चांगलेच माहित आहे.....आता या विषयावर भरपूर राजकारण होईल.......प्रत्येक
पक्ष एकमेकाच्या चारित्र्यावर चिखल फेक करत धूळवंडी साजरी करतील...... आणि
या मंत्र्यांना कोणतीही सजा होणार नाही........ आणि कांही दीवसानी हे शासक
अधिक मोठा गुन्हा करण्यास धजावतील. लोकशाहीच्या नावाने चांगभल . वा रे माझ्या भारत देशा ! वा रे माझ्या भारतीय माणसा
No comments:
Post a Comment