Translate

Sunday, February 5, 2012

पैठणी.......

येवला  तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण  पैठणी विणण्या करता जगप्रसिद्ध आहेत. पैठणी साडी, सोन्या व चांदीच्या तारांनी बनवली जाते.पदरावर मोर किंवा बदक असलेली साडी म्हणजेच पैठणी! कित्येक हजार ते लाखोंमध्ये विकली जाणारी साडी म्हणजे पैठणीच! पैठणी प्रमाणेच औरंगाबाचे सिल्क (रेशीम ) असलेली हिमरू शाल सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे.पर्सिअन कलाकुसर असलेली ही शाल विणकामाचे उत्तम प्रतिक आहे. दोन प्रकारच्या धाग्यांचा मिलाफ हे हिमरू विणकामाचं वैशिष्ट्य. औरंगाबादच्या हिमरूला त्याच्या अद्वितीय शैली आणि डिझाइनमुळे मागणी असली तरीही आज हिमरू विणकाम करणारे फारच थोडे कारागीर उरले आहेत. आता तर इंग्लंड आणि अमेरिकेतही पैठण्यांची निर्यात होत असते.जगात इतरत्र कुठेच तयार होत नसलेली अशी ही पैठणी भारतीय संस्कृतीचा वारसा व महाराष्ट्राची शान म्हणून मानाने जगभर मिरवत आहे. एकूणच ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने पैठणीचा खप होत आहे. 
मात्र तिच्या किमतीबाबत तक्रारीचा सूर कायम आहे. एकीकडे ग्राहक जास्त किमतीबद्दल नाराजी व्यक्त करतात तर दुसरीकडे कष्टाच्या मानाने पुरेसा मोबदला मिळत नसल्याचे रडगाणे विणकर-कारागीर गात असतात. अडचणींच्या या उभ्या आडव्या धाग्यांच्या गुंत्यात पैठणी व्यवसाय गुरफटला आहे.भारतात हे असेच चालते. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी असो वा परंपरागत पारंपरिक वस्तू बनवणारा कारागीर असो त्याच्या श्रमाचा मोबदला कधीच मिळत नाही...........पण या वस्तू विकणारे मध्यस्त दलाल व्यापारी मात्र मालामाल होतात. जय हो !! जय हो!!!

No comments: