गेल्या आठ दिवसा पासून भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना
अब्दुल कलाम आझाद यांच्या छायाचित्राची , माहितीची मागणी अचानक वाढली.
नेहमीच्या फोटोग्राफी दुकानात
यांचे छायाचित्र उपलब्ध नसल्या मुळे यांचे छायाचित्र घेण्या करता शाळा चालकांनी इंटरनेट वर गर्दी केली होती.
अचानक मागणी वाढण्याचे कारण .... भारत सरकार ने, त्यांचा वाढदिवस
पहील्यांदाच मोठ्या उत्सवात साजरा करण्याचे फर्मान काढले आहे ; असे
समजले.. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे १९४७ ते १९५८ पर्यंत भारताचे पहिले
शिक्षण मंत्री होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सक्रीय सहभाग
होता. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे ते पुरस्कर्ते होते....... पण ......
......भारतात प्रत्येक गोष्टीचे राजकारण होत असल्या मुळे त्यांना भारत रत्न
सुद्धा त्यांच्या मृत्यू नंतर तब्बल ३४ वर्षांनी १९९२ मध्ये देण्यात
आला. त्यांच्या आधीच राजीव गांधी रामचंद्रन व्ही व्ही गिरी , इंदिरा गांधी
यांना हा पुरस्कार देण्यात आला होता हे लक्षात घेण्या सारखे आहे. आणि
त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास त्यांच्या मृत्यू नंतर
तब्बल ५४ वर्षांनी ११-११-११ चा शुभ मुहूर्त सरकारला मिळाला, असेही या
११-११-११- एक महात्म्य आहे. उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांच्या निवडणुका
डोळ्या समोर ठेवून मतांच्या राजकारणा साठीच हा निर्णय घेतला गेला हे मात्र
जनतेच्या लक्षात आले.
या महमद तुघलकी निर्णयाचा मोठा फटका मात्र शाळा मास्तरांना,
विद्यार्थ्यांना बसला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या या १२ नोव्हेबर रोजी संपून
त्या दिवशी शाळा उघडणार या हिशोबाने सर्व वेळा पत्रक, बाहेरगावाहून
येण्याचे नियोजन आखले गेले होते.......पण या अखेरच्या क्षणी घेतल्या
गेलेल्या निर्णयाने नियोजनाचे संपूर्ण वेळापत्रक कोसळले आणि आज शाळांत
विद्यार्थ्या सह मास्तरांची उपसस्थिती अत्यंत नगण्य होती......
..............त्या मुळे शिक्षण दिन रीकाम्या वर्गातच साजरा करून
पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवावा लागला.
No comments:
Post a Comment