Translate

Tuesday, June 29, 2010

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन  बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत  हे दिसून येते. केवळ भाषे च्या  नावाने राजकारण करत स्वतः च्या तुंबड्या भरत,  कोटुंबिक भांडणाची राज्याच्या वेशीवर लक्तरे धुवत न  बसता, अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम  सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला , नुसताच अभ्यासक्रम सुरु केला नाही तर या साठी आवश्यक असणारी ग्रंथ संपदा सुद्धा तेथील विद्यापीठांनी तय्यार करून प्रकाशित केली आहे.  हिंदीच्या  नावाने देश की  एकात्मिका की एकमात्र भाषा हिंदी ही है असे धेडगुजरी हिंदीत  ढोल पिटणाऱ्या   भारत  सरकारला सुद्धा गेल्या ६० वर्षात हिंदी भाषेत हे अभ्यासक्रम सुरु करण्याची हिम्मत झाली नाही , व्यवस्था करता आली नाही.  हे देशाचे दुर्देव आहे.
महाराष्ट्रात  मराठीचे नुसते  नाव जरी काढले  तरी डोळे  वाटरनारे केंद्रीय सरकार , बिमारू राज्याचे भ्रष्ट्र  राजकारणी, उटपटांग बातम्या देणारा, वटवट करणारा  मिडिया, विचारवंत,साहित्यिक   लगेच   देशाचे तुकडे होतील म्हणून बोमबाबोम सुरु करतात आणि महाराष्ट्रीय नेते शेपूट घालून पुरणपोळी किंवा इतर उत्सव साजरे करण्यात मश्गुल होतात. आंदोलने अर्ध्यावर सोडून आम्हीच कसे हुशार म्हणत भाषणबाजी सुरु करतात. गेल्या साठ वर्षातील साहित्यिकांनी मराठी भाषे करता फक्त भाषण बाजी करत सरकारच्या फेकलेल्या अनुदान, शिष्यवृत्ती,परदेशी अकेडमीत भरती होत मराठीला अपमानित करण्याचेच काम केले . नेत्यांनी गळ्यात हात टाकताच हे त्यांचे भाट झाले . या नेत्यांनी तमिळ नेत्यांची शिकवणी स्वभाषेचा मान कसा राखावा या साठी आवश्य लावावी. उगीच नाही, केंद्र आणि हिंदीचे मुजोर नेते दक्षिणे समोर  शेपूट हलवत गप्प बसून राहतात. तमिळ भाषेत शिक्षण दिल्या मुळे शैक्षणिक दर्जा खालावेल , देशाचे तुकडे होतील म्हणून बोंबा मारण्याची यांची हिम्मत झाली नाही. आणि मिडिया  भुंकायचे सोडून पेकटात लाथ बसलेल्या कुत्र्यावाणी कोपऱ्यात गप्प पडून राहिला.
तामिळनाडू जे केले ते १००% बरोबर केले.याचा चांगला परिणाम स्थानिक पातळीवरील जनतेला होईल
आपल्या मातृ भाषेत डॉक्टर शिकल्या मुळे सामान्य जनतेशी  रुग्णांशी  आजार पणा बद्दल  तो त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकेल रुग्णानाही डॉक्टर काय उपचार करत आहे हे समजेल.  संपूर्ण युरोपातील देश, चीन जपान  स्वतःच्या मातृ भाषेत ( इंग्रजी नव्हे ) व्यवहार करतात भाषा अभिमान बाळगतात पण आपण अजून इंग्रजाची गुलामगिरी सोडत नाही.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Saturday, June 26, 2010

आजच्या काळातच नाही तर काका-पुतण्याचे नाते पेशवाई पासूनच बदनाम झालेले आहे

सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून,  मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली. जेथे आपणास सोनिया ही परकीय सून राजकारणात चालते, तर सुप्रिया का नको? ही गोष्ट वेगळी आपल्या साहेबांनी सोनियाच्या परकीय पणाला विरोध केला होता. पण साखर,शिक्षण सम्राटांच्या तमाम बारामतीकरांच्या sorry महाराष्ट्राच्या भलेपणा साठी बेरजेचे राजकारण करत त्यांनी सोनियांना पवित्र करून घेतलं. आणि भारताचे कृषी मंत्री झालेत. काय म्हणता यांच्याच  काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाल्यात. साहेबाना बदनाम करण्यासाठी विदर्भाच्या,मराठवाड्याच्या  राजकारण्यांनी टाकलेले हा डाव आहे. बारामती, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कोठे आत्महत्या केल्या का? मग साहेबाना का बदनाम करता .
 तेथे सुप्रिया ताई तर आमच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या जाणत्या राजाची एकुलती एक लाडकी अनिवासी भारतीय कन्या आहे. घार हिंडती आकाशी पर नजर तिची पिल्ला पाशी या न्यायाने जरी सुप्रिया ताई सिंगापूरच्या नागरिक झाल्या असल्या तरी बारामतीच्या पिल्लान वरील त्यांची माया कांही  कमी झालेली नाही.या मायेच्या माये पोटी आणि पिताश्री ला मदत करण्या पोटी त्या बिचाऱ्या स्वतःचे आलिशान सिंगापूर मधील घरदार संसार पतीदेव  सोडून महाराष्ट्राच्या रखरखीत उन्हात, वीज पाणी याची टंचाई असलेल्या  भारतातील महाराष्ट्रातील  बारामती करांच्या सेवे साठी निवडणूक लढवतात .आता या लढाईत त्या  भारतीय नागरिकत्वाचा शुल्लक विचार कशाला करतील? आदनन सामी सारखे पाक कलाकार आपल्या देशात येवून मानसन्मान पैसा  मिळवताच ना . बांगला देशी, पाकीस्थान  घुसखोर तुम्हाला चालतात ना . मग साहेबाच्या  लेकीने INCOME TAX चुकवण्या साठी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर काय बिघडले. आता जाणता राजा जागतिक क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला आहे.त्याच्या माघारी भारतीय क्रिकेट बोर्डाचा ,IPL  (उगाच भलता विचार करू नका) चा कारभार पाहण्यासाठी कोणी तरी विश्वासू पाहिजे ना? आजच्या काळातच नाही तर  काका-पुतण्याचे नाते पेशवाई पासूनच बदनाम झालेले आहे , त्यामुळे   ताई पेक्षा अधिक विश्वासू साहेबाना कोण मिळेल. मराठी मानसं सारखे त्यांचे पाय ओढू नका. तीला कोर्ट कचेरीत अडकवून समाजसेवे पासून रोखू नका. हीच कळकळीचे विनंती. जय मराठी !!
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com



Friday, June 25, 2010

सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे

अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षा पासून सरकार,नोकरशाही , शिक्षण तंज्ञानी  घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार केली आहे.कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे.आपणा कडे कांही योजना असल्यास आपण ही सादर कराव्यात .










माननीय महाराष्ट्र शासन ,
हल्ली मुक्काम मंत्रालय , चूकभूल देणे-घेणे
मुंबई  
सप्रेम नमस्कार, 
विषय :- शिक्षण क्षेत्रा तील आणीबाणी जाहीर करणे बाबत.

सरकारने एक वर्ष शैक्षणिक आणीबाणी जाहीर करून एक वर्ष शाळांना सुट्टी देवून टाकावी.  शिक्षणा बाबत, विषयाबाबत, प्रवेश बाबत, जे कांही निर्णय घ्यायचे ते घ्यावेत.या काळात या कायद्याच्या विरोधात CBSC <ICI आणि इतर संस्थांनी, पालकांनी जी कांही कोर्टबाजी करावयाची ती करावी. न्यायालयाने हि सर्व प्रकरणे गतिमान न्यायालय स्थापन करून त्वरित सुनावणी करून निर्णय द्यावा . आणि हा निर्णय सर्वाना बंधनकारक करावा. या कायद्याची अंमलबजावणी १० वर्ष सर्वाना सक्तीची करावी.कोणालाही या नंतर या पटर्ण मध्ये बदल करता येवू नये.
त्याच बरोबर विद्यार्थी वाहतुकीचे नियम, शाळा प्रवेशाचे बालवाडी पासून कॉलेज पर्यंतचे कायदे, महिन्याची फी, शाळांचे DONATION  , पालकांच्या मुलाखती, शिक्षकांचे पगार, त्यांची कर्तव्य , शिक्षण अभ्यासक्रम, कोणत्याही जातीजामातीस न दुखावता धडे लेखन या बद्दल कायदे करावेत.
 आणि हो शिक्षण  खात्यातील भ्रष्ट्राचारा चा सुद्धा कायदा करून प्रत्येक खाते मान्यते साठी किती लाच द्यावी लागेल ते सुद्धा प्रसिद्ध करावे. या मुळे शाळांना फी विरुद्ध ओरडणाऱ्या पालकांना  हा खर्च किती होतो हे दाखवता  येईल. यामुळे भ्रष्ट्राचारात पारदर्शीपणा येईल. या माझ्या अल्प ज्ञाना प्रमाणे मी या सूचना मांडल्यात.माझ्या पेक्षा शिक्षण तंज्ञाना , सरकारी अधिकाऱ्यांना , शिक्षण मंत्र्यांना, या क्षेत्राचे अधिक चांगल्या प्रकारचे वाटोळे कसे  करावयाचे ते गेल्या तीन चार वर्षा पासून चांगले माहित झाले त्या मुळे यांच्या अनुभवाचा फायदा करून घेत अधिक नियम, कायदे करावेत.
हीच अपेक्षा. कळावे लोभ असावा. ही विनंती
Thanks & regard,
आपला त्रासलेला सामान्य पालक ,
Thanthanpal,  date :- 25/06/2010

Thursday, June 24, 2010

त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण




 त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण
प्रेषक thanthanpal (गुरू, 06/24/2010 - 10:10)
जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com/यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया वाचून मी ही प्रतिक्रिया दिली.ती खाली देत आहे.
जगातील सर्वात जुना असा हा व्यवसाय होता, आहे आणि भविष्यात राहणार आहे.पण मध्यम वर्गीयांचा प्रोब्लेम म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे किंवा मी नाही त्यातली कडी लावा आतली असा आहे. आज हा व्यवसाय आहे म्हणूनच आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे आपण विसरतो. हा व्यवसाय या स्त्रिया कांही मजेखातर करत नाही.त्यांचीही मजबुरी असते. समाजाच्या गरजे प्रमाणे व्यवसाय निर्माण होत असतात.यामुळे इतर व्यवसाय कडे आपण ज्या स्वच्छ नजरेने बघतो तसे या व्यवसाया कडे पाहीले तर यातील धोके,फसवणुकीचे प्रकार थांबतील पण असे झाले तर यातील दलालांचे नुकसान होईल यात समाजातील अनेकांचे हितसंबंध नोकरशाही, पोलीसवर्ग, राजकारणी वर्ग यांचे गुंतलेले आहे. त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण सर्व यांच्या कमाई वर होते. पण दुर्देव्य ते लोक सुद्धा यांचा तिरस्कार करतात. जर ह्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देवून, या स्त्रियांना अधिकार दिले तर पिळवणूक करणाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात येतील.म्हणूनच या व्यवसायासा संबंधी अनेक गैरसमज पसरवले जातात. अखेरीस एकच प्रश्न yaar hamaari baat suno aisaa ik insaan chuno jisane paap naa kiyaa ho jo paapi naa ho.

Sanjeev says:
जून 23, 2010 at 1:40 pm
ठणठणपाळ, मानलं तुम्हाला ! १००% सत्य! आपण नैतिकतेचे ढोल फ़ार वाजवतो, पण कायदा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यावर मौन बाळगतो.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Sunday, June 20, 2010

भ्रष्ट्र राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल


 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

भगवान श्री कृष्ण यांनी अर्जुनाला युद्धाच्या रणांगणात  भर युध्दामध्ये गीता सांगत आहेत. हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.....
...आणि  भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून भारतीय जनता सामान्य माणूस महाभारत संपल्यावर आणि विशेषत: गेली  ६३  वर्षे त्या भगवंताची वाट पाहत स्वातंत्र्यात
कसेबसे दीवस कंठत आहे. पण आजच्या भारताची दुरवस्था पाहता भगवान अजून या देशाचा किती सत्यानाश होई पर्यंत प्रकट होण्याची वाट पाहणार आहे? हा प्रश्न निर्माणहोतो. 

Sunday, June 6, 2010

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा, गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,

पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!  पण जगातील महासत्तेची मुंगेरीलाल स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय राजकारण्यांच्या कानात हा आवाज पोहचत नाही. अन्न-पाणी, वस्त्र, निवारा,वीज रस्ते  या प्राथमिक आवश्यक गरजा गेल्या साठ वर्षात  पूर्ण न करता राज्यकर्ते जनतेला रोज नवनवीन स्वप्ने दाखवण्यात दंग आहेत. ही स्वप्ने ही लहानसहान असत नाही.कधी कोकणचा कॅलिफोर्निया , कधी मुंबईचे सिंगापूर,तर कधी शांघाय , होगंकोंग तर कधी जगाची आर्थिक आण्विक महासत्ता, आणि या महासत्तेची राजधानी मुंबई. झोपडपट्टी,गरिबी मुक्त , गगनचुंबी इमारती मोल्ल्स , भव्य शॉपिंग सेंटर मल्टी फ्लेक्स  सिनेमा असलेली  आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोही कडे अशी नगरी. http://www.ndtv.com/news/videos/video_player.php?id=145226

मेरा भारत महान !!!!!!

                          मेरा भारत महान !!!!!!

Tuesday, June 1, 2010

पपा डॉक


पपा डॉक

भारतातील  घरगुती डॉक्टर ही  कल्पना पाशिमात्यांचे अंधानुकरून करून आपण  बरखास्त करण्याच्या प्रयत्नात असताना ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधे गेली ६३ वर्ष  काम करणारे पपा डॉक  यांच्या संबंधी माहितीचा हा मेल आला. आपणास पाठवत आहे.
खरच माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते. घरातील प्रत्येक निर्णय हे डॉक्टरांच्या संमतीनेच घेतले जात होते.