Translate

Saturday, October 24, 2009

तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .. त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला..


त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज  आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत  खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा अभ्यास करावा. उडाले ते कावले आणि मागे राहिले ते मावले या बेफिकिरी मुले आपल्या मागे कोण राहिले हें मागे वलून पहान्याचे कष्ट आपण घेतले नाही.

राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .

गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी  सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण  आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .

No comments: