Translate
Tuesday, April 23, 2013
Sunday, April 21, 2013
हि सुरक्षा व्यवस्था कि मुकेश अंबानी यांच्या वर सरकार ची पाळत
हि सुरक्षा व्यवस्था कि
मुकेश अंबानी यांच्या वर सरकार ची पाळत . २०१४ ची निवडणुका जवळ येत आहे या
करता कॉंग्रेसला कांही दगाफटका मुकेश कडून होऊ नये या बाबत सरकारची
ही काळजी तर नव्हे.
मुकेश यांचे स्वतःचे असे कमॉनडोज सुरक्षा रक्षकांचे अभेद्द जाळे असताना आणि ते सुरक्षा व्यवस्थेवर कोट्यावधी खर्च करू शकत असताना सरकारला हा खर्च करण्याची का आवश्यकता भासली???? ….
देशात टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, प्रेमजी अझीज , गोदरेज, राहुल बजाज यांच्या सारखे हजारो उद्योगपती आहेत पण ते कधी अंबानी बंधू सारखे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरताना दिसत नाही …। मग या अंबानी बंधुनाच एव्हढ्या मोठ्या सुरक्षा जाळ्याची काय आवश्यकता??????…
इंडियात हजारो महिला अत्याचाराला बळी पडत असताना त्याना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राजधानी दिल्ली तर बलात्काराची राजधानी झालेली आहे
…। सामान्य जनता या अत्याचारा विरुद्ध कोणाच्या ही भडकावण्या शिवाय रस्त्यावर उतरत आहे. त्या जनतेला सुरक्षिततेचा दिलासा देण्या ऐवजी त्यांच्या वरच लाठीमार होत आहे. अश्या वाईट अवस्थेत जनतेला सुरक्षा पुरवण्या ऐवजी अंबानीला सुरक्षा व्यवस्था देण्यात गृहमंत्रालय मग्न आहे. भारतात १०० दीडशे वर्षे उद्योगात असणाऱ्यानां कधी धमकीची पत्रे आली नाही ती अंबानी यांनाच कशी येतात???
रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. झेड' दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत अंबानी हे मुंबई शहर आणि शहराबाहेर फिरत असताना चोवीस तास त्यांच्याभोवती सीआरपीएफचे कमांडो राहतील. शिवाय अंबानी यांच्या वाहनापुढे कमांडोंचे एक पायलट वाहन असेल आणि एक सशस्त्र कमांडोंचे पथक मागे राहणार आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19664528.cms

Sunday, April 14, 2013
निर्लज्ज समर्थन.....
लक्ष्मण माने कार्याध्यक्ष शारदाबाई पवार आश्रम शाळा … माजी आमदार, साहित्यिक लक्ष्मण माने याने नोकरीत
कायम करण्याचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप सात महिलांनी
केला. त्या नंतर लक्ष्मण माने १५ दीवस फरार होता …पोलिसांना सापडत नव्हता
… हा लक्ष्मण माने म्हणजे एक धंदेवाईक राजकारणी आहे ; हे साताऱ्यात सर्व
जनतेला माहीत आहे . या सर्व गोंधळात असे धंदेवाईक राजकारणी दिल्ली पासून ओसाड गावच्या गल्ली
पर्यंत पसरलेले आहेत; या कडे मात्र सफाईदार पणे दुर्लक्ष केले गेले. वास्तविक पाहतां या गोष्टीवर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे…….
बड्या राजकारण्याच्या नावाने, त्यांच्या नातलगांच्या नावाने आश्रम शाळा , वृद्धाश्रमा पासून ते झोपडपट्ट्या बेकायदेशीर पणे उभ्या करायच्या , NGO ट्रस्ट करून संस्था स्थापन करायच्या आणि सेवेच्या नावा खाली मेवा खायचा …, वर्षाला एक दोन समारंभ करून त्यात जिल्हाधिकाऱ्या पासून पोलीस अधिकारी वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ राजकीय नेत्यांचा सत्कार उदो उदो करावयाचा त्याना नजराणे द्यायचे आणि मिडीयाला हाताशी धरून या कार्यक्रमाच्या पानभर पेड जाहिरातीच्या माध्यमातून बातम्या द्यायच्या हा प्रकार देशात राजरोस चालू आहे. राज्यकर्तेही हा प्रकार माहीत असून ही मतांच्या लाचारी साठी खपवून घेतात. आपल्या आई च्या नावाने सुरु असलेल्या माने याच्या आश्रम शाळेत काय धंदे चालतात हे पवार सारख्या मुरब्बी राजकारण्याना माहीत नव्हते या वर कोणी विश्वास ठेवणार नाही . गांधी नेहरू खानदानच्या नावाने प्रत्येक गावातील सरकारी जागेवर गल्ली बोळात उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपडपट्याना त्यातील मवाली गुंडाना स्थानिक राजकारण्याचा वरदहस्त असतो हे उघड गुपित झाले आहे…. एखादे वेळी कार्यवाई झालीच तर मानवतावादा च्या नावाने गळे काढायला हे नेते तयारच असतात. ‘तू माङयाशी बायकोप्रमाणो वाग, तुझा पगार वाढवतो, तुला कायम करतो,’ असे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांनी हा अत्याचार केल्याचे या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे तर स्वतः लक्ष्मण माने यांनी पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर बोलताना की मी बलात्कार करण्यासाठी लायक नसतानाही खोटे आरोप करून माझ्यावरच बलात्कार केला जात आहे. एकंदरीत अवघडच आहे. लक्ष्मण माने वर जो पर्यंत गुन्हा शाबित होत नाही तो पर्यंत त्याला गुन्हेगार म्हणू नये…. या तक्रारदार स्त्रिया इतकी वर्षे अत्याचार का ? सहन करत होत्या …. आताच का आरोप होत आहेत ? माने याला बदनाम करण्याचा हा डाव आहे , अश्या तऱ्हेने युक्तिवाद करून माने हा निर्दोष आहे असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे.
पण एकंदरीत या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या समाज संस्थांचा संशयित कारभार पाहता स्त्रियांचे आरोप, हे कट कारस्थानाचा भाग आहे यावर विश्वास बसणे मात्र कठीण आहे. शरीर संबंध हा दोघांच्या स्वखुषीचा मामंला होता पण आर्थिक व्यवहार फिस्कटल्या मुळे स्त्रियां हा आरोप करत आहेत हे जर मान्य केले तर हा अधिक भयानक प्रकार आहे. आर्थिक आमिष दाखवून स्त्रियांचा उपभोग करावयाचा आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करावयाचे हे घातक आहे.

एक दवंडी ऐका हो ऐका ....… विना अनुदान मातृभाषा शाळां वाटपाचा जंगी कार्यक्रम….
(महत्वाची सुचना :- महाराष्ट्र सरकारने सध्या २०१३ जाहीर केलेल्या विना अनुदान मराठी शाळा वाटपाच्या जंगी कार्यक्रमाचा आणि या लेखातील ओसाडवाडी राज्याच्या महाराजांच्या शाळा वाटप योजनेचा अर्थाअर्थी कांही संबंध नाही . असलाच तर महाराष्ट्र सरकारने आमचा कार्यक्रम पळवला असे समजण्यात यावे.)
एक दवंडी ऐका हो ऐका ....… विना अनुदान मातृभाषा शाळां वाटपाचा जंगी कार्यक्रम….
डम डम डम डम ऐका हो ऐका ऐका … ऐका हो ऐका s s s s s s... ओ सखाराम , ए तुकाराम ... तात्या, नाना, मामा, काका, भावांनो, टग्यानो आणि सगळ्या गावकऱ्यानों , ताया-बायांनो ध्यान देऊन ऐका… परत परत दवंडी होणार नाही , कोणालाही परत संधी भेटणार नाही . लक्ष असु द्या ईकडे …. ओ ओ ओ ओ s s s s s
ओसाडगावा च्या महाराजांनी,महाराणी यांनी सर्व शिक्षण योजने अंतर्गत सर्व मुलाना शिक्षणाचा हक्क बहाल केला आहे. त्याच बरोबर मुलां मुलींना मोफत शिक्षण हक्क ही बहाल करण्यात आला आहे.…. याचाच परीणाम राज्यात शिक्षणा साठी शाळा कमी पडत आहे. या साठी महाराजांनी पैसा खर्च करण्याची ऐपत असणाऱ्या पालकांच्या मुलां मुलीं साठी बांधा, शिकवा, लुटा या तत्वा वर राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात वाड्या तांड्या मध्ये विना अनुदानित शाळा या तत्वा वर मातृभाषा शाळा सुरु करण्याचे ठरविले आहे. या योजनेनुसार शाळा सुरु करण्याचे s s s s प्रस्ताव मागविण्यात आले आहेत .…ओ ओ s s s . शाळा प्रस्तावाच्या अटी नियम पुढील प्रमाणे आहेत .….
१ ) स्वच्छ कार्य प्रणाली साठी सर्व प्रस्ताव ई संगणक टेंडर प्रणाली द्वारेच दाखल करावे लागतील . आणि त्याची एक छापील पेपर प्रत (hard copy ) शिक्षणाधिकारया कडे सादर करावी लागेल .
२ ) आपणास शिक्षणाची आवड असावीच अशी अट नाही; आपणास शिकवता येत नसले तरी चालेल.
३) साखर, मद्द, भेसळ, भूखंड काळाबाजार सम्राट आणि वाळू , तेल माफियांना आपला काळा पैसा या शैक्षणिक धंद्यात गुंतवणूक पांढरा करण्याची आणि समाजात मानाने जगण्याची उत्तम संधी . अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते . परतपरत ही संधी मिळणार नाही .
४ ) आपणा कडे फक्त १५ लाखं पांढरा पैसा आणि शाळा बांधकामा साठी १५ लाखं बँकेत जमा असणे आवश्यक आहे. आणि २ ते ५ एकर चा भूखंड बस्स…. आपण शाळा शिक्षण सम्राट होऊ शकता .
५ ) आपण कीती ही शाळांचे प्रस्ताव दाखल करू शकता फक्त त्या पटीत आपणा कडे पांढरा पैसा आणि भूखंड असणे आवश्यक आहे.
६ ) ज्या गावा करता, वाड्या तांड्या करता ऐका पेक्षा जास्त प्रस्ताव येतील; तेथे ज्याने सर्वात जास्त अनामत रक्कम भरली असेल त्याला शाळा बहाल करण्यात येईल . या करता जास्तीत जास्त अनामत रक्कम भरावी . कमीत कमी अनामत रक्कम १५ लाखं आणि त्या नंतर त्याच्या पटीत .
शाळा बहाल करण्याचे सर्व हक्क महाराजांच्या , महाराणींच्या , राजकुमारांच्या आणि राजकुमारींच्या वरिष्ठ शाळा शिक्षण समितीला असेल. एक कींवा सर्व प्रस्ताव मान्य करण्याचा कींवा नाकारण्याचा हक्क अधिकार फक्त या समितीलाच असल्या मुळे कोणीही मध्यस्त , दलाल मंत्री राजवाड्यातील कर्मचारयांना लाच, स्त्री मद्द आमिष देण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रयत्न करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे . या अमिषासाठी स्वतःह महाराज,महाराणी, राजकुमार , राजकुमारी याना मध्यरात्री एकांतात भेटावे. या भेटी साठी आगाऊ वेळ आणि राजवाड्यात प्रवेश करण्याचा पास देण्याचा अधिकार फक्त या चौघांनाच आहे .
जाता जाता एक उघड गुपित सिक्रेट …… भविष्यात या विना अनुदानित शाळा माफियांच्या दबाबाने शिक्षकांनी परीक्षांच्या कामात असहकार, उत्तरपत्रिका न तपासणे , शिक्षकांचे साखळी उपोषण अशी आंदोलने केल्यावर विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्या साठी या शाळा ना मांडावली, तोडपानी करून अनुदान देण्यात येईल . अर्थात त्याचा लगान वेगळा आकाराला जाईल .

Subscribe to:
Posts (Atom)