Translate

Wednesday, January 23, 2013

6,80,000 Forcible Rapes Per Year

पंधरा ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री इंडिया/ भारत स्वतंत्र झाला त्याच क्षणी मनात बेआबरू  होण्याची भीती, कायद्यात, व्यवस्थेमध्ये माफी नाही ही  भीती, तळतळ / शाप / दुखः आयुष्यभर सतावत राहील ही भीती ही नागरिकांच्या मनातून नाहीशी झाली...... कारण आपण स्वतंत्र भारताचे स्वैराचारी नागरिक झालो. स्वातंत्र्य शहीदांच्या बलिदानातून नाही तर अहिंसे मिळाले हे भासवण्यात आले.....आणि ज्या गोष्टी फुकट मिळतात त्याचे महत्व राहत नाही....त्या मुळे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची त्याच बरोबर समोरच्याच्या स्वातंत्र्याची कींमत राहीली नाही......
नेहरू पासून ते मनमोहनसिंग सह विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ही   पाय मातीचेच निघाले नव्हे तर भ्रष्ट्राचाराच्या चिखलाने भरलेले निघाले.... सत्य साईबाबा , भगवान रजनीश आसाराम बापू आदी आध्यात्मिक धर्म गुरु नि धर्माच्या नावावर अधार्मिक कामेच केली. चमत्कार करून भक्ताना हजारो करोडोचा गंडा घातला , सेक्स रॉकेट चालविणे काळा पैश्याचे व्यवहार इत्यादी करणा मुळे हे धर्म गुरु बदनाम झालेत या मुळे धर्माची भीती नाहीशी झाली..,
पोलिस, न्यायालयीन .शासकीय प्रशासन हे या काळात राजकीय हस्तक्षेपा मुळे पूर्णपणे उध्वस्त झाले. नाक्या नाक्या वरील पोलिसांच्या  हप्ता वसुली मुळे पैश्याने सगळे विकत घेता येते हे शेंबड्या पोराला ही माहित झाल्या मुळे पोलिस यंत्रणेचा धाकच राहीला नाही..
आणि आजच्या बाजारीकरण झालेल्या शिक्षण पद्धती मध्ये , आणि बालकाना  शिक्षा नको या मूर्खपणाच्या धोरणा मुळे शिक्षकच विद्यार्थ्याला  घाबरत आहेत........
आणि १९८० च्या भोगवादी, चंगळवादी बाजारीकरणा मुळे वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणत करण्यासाठी वस्तूच्या जाहिरातीत स्त्रीला उपभोग्य , उपभोग करताच असलेली वस्तू म्हणून अर्धनग्न स्त्रीचा बेपर्वाईने वापर केला गेला. जे जाहिरातीचे तेच नाटक सिनेमाचे झाले. स्वातंत्र्यच्या नावा खाली ही भोगवादी गिधाडे संस्कृती रंगमंचावर सिने पडद्यावर व्यापून राहिली....
साहित्यिकां बद्दल तर न बोललेलेच बरे... लेखन स्वातंत्र्याच्या नावा खाली उघड उघड व्याभिचारांचे लेखन बिनधास्त पणे लेखक करू लागले. यात स्त्री लेखिकां सुद्धा मागे नव्हत्या... हुसेन सारखे चित्रकार तर नग्न चित्र काढणे म्हणजेच कलाकारांचे कलावंतांचे स्वातंत्र्य समजू लागली आणि दुर्देवाने या सर्वाना राजमान्यता मिळाली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मिडीया पेड न्यूज च्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे....यामुळे बातमी पेक्षा सनसनाटी  ब्रेकिंग बातम्याचा भडीमार सुरु झाला आहे.....यातूनच मग बलात्काराच्या बातम्यांचे ही बाजारीकरण झाले......बलात्काराच्या बातम्या ह्या बलात्काराच्या दृष्टीकोणातून न देता जात, धर्म, शहरी, ग्रामीण , आदीवासी भागातील , महिलां वरील बलात्कार अश्या स्वरूपात दील्या जावू लागल्या....आणि समाजात तेढ निर्माण करून परत TV वर अंतहीन निर्बुद्ध चर्चा करण्यास तय्यार असतात.
................आणि समाज जो रेप बलात्कार होत असताना आपण त्या गावाचेच नाही म्हणत कर्तव्या पासून पळ काढतो ...तोच समाज मग दंडावर, तोंडावर  काळ्या  फीती लावून निषेध मोर्चा काढतो.....गेला बाजार इंडिया गेट , गेटवे ऑफ इंडिया वर मेणबत्ती जाळत व्यवस्थेचा निषेध करून गप्प बसतो...
आधुनिक भारतातील ज्या शिवाजी, आंबेडकर , सावरकर यांचा आदर्श घ्यावा त्याना सुद्धा आपण जातीपातीच्या भिंतीत बांधून सत्तेचे घाणरडे राजकारण चालू केले.......
....या सर्वाचा परिणाम जनाची नाही तर मनाची ही लाज वाटेनाशी झाली........ मग भीती वाटणे तर दूरची गोष्ट ....... याचाच परिणाम मग बलात्कार , घरगुती हिंसाचार वाढण्यात झाला. पैसा फेको तमाशा देखो म्हणणे म्हणजे सुद्धा तमाशाचा अपमान होईल असा   एक नव उपभोगवादी  समाज आपण निर्माण केला याचे दुष्परिणाम भोगण्या शिवाय आपल्या हातात कांही नाही. एक म्हण आहे रेप सहन होत नसेल तर तो एन्जोय करा ही  वृत्ती फोफावत आहे. म्हातारी मेल्याचे दुख: नाही..... काळ सोकावत आहे.

No comments: