Translate

Wednesday, January 30, 2013

आत्यंतिक गोपनियता ते धोबी घाटावर च्या बातम्या.........

Sanjay Barve पुरूष आणि  स्री यांच्या मधील एकांतात, आंतरीक अन चार भिंतीच्या  आड होणारा संबंध चव्हाट्यावर येणे म्हणजे पुढारलेपणा का ?
की पारदर्शीपणा ?...................
...............................
ना तर हा पुढारलेपणा ना हा पारदर्शीपणा ..... हा तर बाजारीकरणाचा हलकटपणा झाला आहे...आणि याचे दुष्परिणाम स्त्रियांच्या भावनां वर अतिशय वाईट होणार आहेत. दिल्ही च्या बलात्काराच्या बातम्या मिडीयाने ज्या बाजारू पद्धतीने दिल्या....त्यातच राजकीय नेते , धार्मिक स्वयंम गुरु यांनी जे अक्कलेचे तारे तोडले त्या मुळे एकांतातील, आंतरीक अन चार भींतीच्या आड होणाऱ्या संबंधा वर या दहशदवादी अतिरेकी बलात्कारी बातम्यां मुळे निश्चित परीणाम झाला आहे...स्त्रियांच्या मनात तर या स्त्री-पुरुष संबंधा बद्दलच घृणा निर्माण झाली आहे.....यामुळे नवरा बायकोच्या संबंधा वर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे..... या संबंधा बद्दल भारतीय समाजात असलेली आत्यंतिक गोपनियता ते धोबी घाटावर च्या बातम्या हा प्रवास नक्कीच चुकीच्या मार्गाने होत आहे.... बातम्या देण्यावर कोणते ही सेन्सॉर नियमन नसल्या मुळे अधिकाधिक भडक, अतिरंजित बातम्या ह्या नक्कीच समाजाला विघातक ठरणार आहे....याचा विचार करण्याची

Sunday, January 27, 2013

इंडिया की अजब गजब प्रगती का यथार्थ प्रदर्शन....कुछ और झाकीयां

कड़े सुरक्षा इंतजामों के बीच देशभर में 64वें गणतंत्र दिवस समारोह संपन्न हुवा । मुख्य समारोह देश की राजधानी दिल्ली में हुआ। राजपथ पर गणतंत्र दिवस की परेड का भव्य नजारा दिखाई दिया। इसमें देश की ताकत और विविधता का प्रदर्शन किया गया  .राष्ट्रपति प्रणब मुखर्जी के तिरंगा फहराने और राष्ट्रगान की धुन के साथ ही गणतंत्र दिवस की भव्य परेड राजपथ से लालकिले के लिए शुरू हुई। सेना  की परेड ताकत दिखाने  के बाद भारत की सांस्कृतिक  विविधता से राजपथ रंग गया। अलग-अलग राज्यों की झांकीयों  ने मन मोह लिया। इस राजपथ पर हमारे दोस्तों ने  इस झाकीयों मै कुछ और झाकीयां पेश होती होती तो वों झाकीयां सही अर्थ मै इंडिया की अजब गजब प्रगती का यथार्थ प्रदर्शन कराती कहते हुवे कुछ खास चित्ररथ की तस्वीर बनायीं।।। वो आपके लिए पेश है।



https://www.facebook.com/BodyDonationEyeDonationBloodDonation

please visit and write thanks!!

PLEASE JOIN PLEASE JOIN BODY DONATION PAGE........
SOCIAL NETWORKING SITE DEDICATED......TO EYE DONATION, BLOOD DONATION AND BODY DONATION
prabhakar bakle PBN
https://www.facebook.com/BodyDonationEyeDonationBloodDonation
Body donation eye donation blood donation
SOCIAL NETWORKING SITE DEDICATED......TO EYE DONATION, BLOOD DONATION AND BODY DONATION
SOCIAL NETWORKING SITE DEDICATED......TO EYE DONATION, BLOOD DONATION AND BODY DONATION
Page: 33 like this.

Wednesday, January 23, 2013

6,80,000 Forcible Rapes Per Year

पंधरा ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री इंडिया/ भारत स्वतंत्र झाला त्याच क्षणी मनात बेआबरू  होण्याची भीती, कायद्यात, व्यवस्थेमध्ये माफी नाही ही  भीती, तळतळ / शाप / दुखः आयुष्यभर सतावत राहील ही भीती ही नागरिकांच्या मनातून नाहीशी झाली...... कारण आपण स्वतंत्र भारताचे स्वैराचारी नागरिक झालो. स्वातंत्र्य शहीदांच्या बलिदानातून नाही तर अहिंसे मिळाले हे भासवण्यात आले.....आणि ज्या गोष्टी फुकट मिळतात त्याचे महत्व राहत नाही....त्या मुळे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची त्याच बरोबर समोरच्याच्या स्वातंत्र्याची कींमत राहीली नाही......
नेहरू पासून ते मनमोहनसिंग सह विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ही   पाय मातीचेच निघाले नव्हे तर भ्रष्ट्राचाराच्या चिखलाने भरलेले निघाले.... सत्य साईबाबा , भगवान रजनीश आसाराम बापू आदी आध्यात्मिक धर्म गुरु नि धर्माच्या नावावर अधार्मिक कामेच केली. चमत्कार करून भक्ताना हजारो करोडोचा गंडा घातला , सेक्स रॉकेट चालविणे काळा पैश्याचे व्यवहार इत्यादी करणा मुळे हे धर्म गुरु बदनाम झालेत या मुळे धर्माची भीती नाहीशी झाली..,
पोलिस, न्यायालयीन .शासकीय प्रशासन हे या काळात राजकीय हस्तक्षेपा मुळे पूर्णपणे उध्वस्त झाले. नाक्या नाक्या वरील पोलिसांच्या  हप्ता वसुली मुळे पैश्याने सगळे विकत घेता येते हे शेंबड्या पोराला ही माहित झाल्या मुळे पोलिस यंत्रणेचा धाकच राहीला नाही..
आणि आजच्या बाजारीकरण झालेल्या शिक्षण पद्धती मध्ये , आणि बालकाना  शिक्षा नको या मूर्खपणाच्या धोरणा मुळे शिक्षकच विद्यार्थ्याला  घाबरत आहेत........
आणि १९८० च्या भोगवादी, चंगळवादी बाजारीकरणा मुळे वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणत करण्यासाठी वस्तूच्या जाहिरातीत स्त्रीला उपभोग्य , उपभोग करताच असलेली वस्तू म्हणून अर्धनग्न स्त्रीचा बेपर्वाईने वापर केला गेला. जे जाहिरातीचे तेच नाटक सिनेमाचे झाले. स्वातंत्र्यच्या नावा खाली ही भोगवादी गिधाडे संस्कृती रंगमंचावर सिने पडद्यावर व्यापून राहिली....
साहित्यिकां बद्दल तर न बोललेलेच बरे... लेखन स्वातंत्र्याच्या नावा खाली उघड उघड व्याभिचारांचे लेखन बिनधास्त पणे लेखक करू लागले. यात स्त्री लेखिकां सुद्धा मागे नव्हत्या... हुसेन सारखे चित्रकार तर नग्न चित्र काढणे म्हणजेच कलाकारांचे कलावंतांचे स्वातंत्र्य समजू लागली आणि दुर्देवाने या सर्वाना राजमान्यता मिळाली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मिडीया पेड न्यूज च्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे....यामुळे बातमी पेक्षा सनसनाटी  ब्रेकिंग बातम्याचा भडीमार सुरु झाला आहे.....यातूनच मग बलात्काराच्या बातम्यांचे ही बाजारीकरण झाले......बलात्काराच्या बातम्या ह्या बलात्काराच्या दृष्टीकोणातून न देता जात, धर्म, शहरी, ग्रामीण , आदीवासी भागातील , महिलां वरील बलात्कार अश्या स्वरूपात दील्या जावू लागल्या....आणि समाजात तेढ निर्माण करून परत TV वर अंतहीन निर्बुद्ध चर्चा करण्यास तय्यार असतात.
................आणि समाज जो रेप बलात्कार होत असताना आपण त्या गावाचेच नाही म्हणत कर्तव्या पासून पळ काढतो ...तोच समाज मग दंडावर, तोंडावर  काळ्या  फीती लावून निषेध मोर्चा काढतो.....गेला बाजार इंडिया गेट , गेटवे ऑफ इंडिया वर मेणबत्ती जाळत व्यवस्थेचा निषेध करून गप्प बसतो...
आधुनिक भारतातील ज्या शिवाजी, आंबेडकर , सावरकर यांचा आदर्श घ्यावा त्याना सुद्धा आपण जातीपातीच्या भिंतीत बांधून सत्तेचे घाणरडे राजकारण चालू केले.......
....या सर्वाचा परिणाम जनाची नाही तर मनाची ही लाज वाटेनाशी झाली........ मग भीती वाटणे तर दूरची गोष्ट ....... याचाच परिणाम मग बलात्कार , घरगुती हिंसाचार वाढण्यात झाला. पैसा फेको तमाशा देखो म्हणणे म्हणजे सुद्धा तमाशाचा अपमान होईल असा   एक नव उपभोगवादी  समाज आपण निर्माण केला याचे दुष्परिणाम भोगण्या शिवाय आपल्या हातात कांही नाही. एक म्हण आहे रेप सहन होत नसेल तर तो एन्जोय करा ही  वृत्ती फोफावत आहे. म्हातारी मेल्याचे दुख: नाही..... काळ सोकावत आहे.

Saturday, January 19, 2013

Not for khar-ab neighbour .

खराब भांडकुडळया शेजाऱ्या बरोबर कसे वागावे हे या छोट्या अमूल बेबीला चांगले समजते आणि ती म्हणते बटर not for khar-ab neighbour . पण आपल्या भ्रष्ट्र बेईमान  राज्यकर्त्याना एव्हढी साधी गोष्ट समजत नाही. इंडिया च्या नेत्यानो कांही शिका या लहान अमूल बेबी कडून .

Friday, January 4, 2013

राजा म्हणजे साक्षात देव असतो ........

...........नाही तरी एक इंग्रजी एक म्हण आहे. if rape is inevitable relax and enjoy it" .......... राजा म्हणजे साक्षात देव असतो .........लोकशाही राज्यात  आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचे   साक्षात देवच....... आता या देवानीच बलात्कार केला तर जनतेने तो आनंदाने स्वीकारलाच पाहिजे. त्या विरुद्ध आवाज उठवू नये असेच न्यायालयाचे मत असेल.........म्हणूनच ......आजच्या सर्वच वर्तमान पत्राचा मुख्य मथळा गुन्हा दाखल असलेल्या लोकप्रतिनिंधींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण. अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये अडकलेल्या आमदार, खासदारांना निलंबित करण्याचा मुद्दा आपल्या अखत्यारीत येत नाही, महिलावंरील अत्याचारांप्रकरणी ज्या लोकप्रतिनिधींविरोधात (आमदार, खासदार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधीची याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला...............................
 आपणजनते  ने या विरुद्ध कांही प्रतिक्रिया देऊ नये हेच शहाणपणाचे लक्षण आहे.....फट म्हणता न्यायालयाचा तो ही  सर्वोच्च न्यायालयाचा अवमान व्हायचा आणि बलात्कारी आमदार खासदार राजकीय नेते सोडून आपणास न्यायालयाच्या अवमाना प्रप्रकारणी जेल मध्ये जावे लागेल. म्हणून यावर कांही प्रतिक्रिया नाही.आपण ही  देऊ नका.........