Translate

Saturday, October 6, 2012

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

अजितदादांचा राजीनामा........ याच रहस्य , गूढ २०१४ साली जेंव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेंव्हाच  जनतेला समजेल..तो पर्यंत या राजीनाम्याची कारणे शोधणे, अजितदादांचा गेम कोणी केला या रहस्या भोवतीच सर्व चर्चा होत राहतील आणि......हिंदी सिनेमा प्रमाणे एक एक नाव  बाद होत जाईल......आणि  द एंड काय असेल हे आज फक्त म्हणजे फक्त शरद पवार साहेबच जाणून असतील......आणि साहेबांच्या मनात काय आहे हे खुद्द साहेबच सांगू शकणार नाही...
एक मात्र खरे....... गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या वगनाट्याचा प्रयोग महाराष्ट्रात तुफान रंगणार आहे...आणि महाराष्ट्रात शाहीर ,मावशी, राधा गवळणी, कीसन देवा,पेंद्या, नायक, राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, खलनायक, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्या,  भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, आणि... विदुषक-सोंगाड्या यांची कमी नाही ....आणि यात नवीन भर पडली ती म्हणजे पत्रकार आणि मिडीया..... शरद पवार यांच्या मनाविरुद्ध अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या मुळे पवार कुटुंबात कलह कधी होतो आपण ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी कधी देतो या साठी मिडीयावाले  २०१० पासून व्ह्यूव  रचना करत आहेत .....आतील गोटातील खास बातम्या प्रसिद्ध करत आहेत.....

२०१४  पर्यंत कोणी कोणाचा कात्रज चा घाट केला.....काका विरुद्ध पुतण्या विरुद्ध बहीण  काका मला वाचवा .......उलट पुतण्या मला वाचाव ......... असे म्हणण्याचे सध्या महाराष्ट्रात दीवस आले आहेत......बघा नजदीक चा इतिहास .......बाळासाहेब काका पुतण्या मनसे-राज,  मुंढे काका पुतण्या धनंजय बघा जनता काय म्हणते???.....कोणाच्या बाजूने आहे.......????अजून ही ९९.९९ % जनता अजितदादांचे हे सर्व जरा चुकलेच...पाहत रहा कॉंग्रेस V/S राष्ट्रवादी कॉंग्रेस V/S भाजपा V/S शिवसेना V/S मनसे V/S आठवले V/S आंबेडकर V/S जनता  महाराष्ट्राचा जंगी सत्ता सामना २०१४.

No comments: