काल tv वर मलाला यूसुफजई ची मुलाखत
पाहीली....अणि तिच्या हिम्मतीला, तीच्या नजरे समोर असलेल्या ध्येयाला
साष्टांग दंडवत घातला......अवघ्या १४ वर्ष वयाची..... प्रेम कविता गाणी
सिनेमा च्या स्वप्नमय जीवनात जगण्याच , धिंगाणा मस्ती करण्याच वय असताना
ती चक्क राजकारणात जाऊन देशाची पंतप्रधान होण्याचे स्वप्न नव्हे ध्येय
आपल्या समोर आहे हे खणखणीत पणे सांगते.......आपण राजकारणात आलो तरच आपल्या
देशाची परिस्थिती सुधारू शकतो आणि मुलींच्या शिक्षणा करता काम करू शकतो या
वर तीचा ठाम विश्वास आहे.....आपल्या कडील तरुण तरुणींच्या राजकारणा पासून
दूर पळण्याच्या पार्श्वभूमीवर या बंदुकीच्या तोफेच्या गोळ्यांच्या आवाजातच
जीवन जगणाऱ्या मलाल च्या रोखठोक विचारांचे कौतुक वाटते....... कदाचित या
युद्धमय वातावरणा मुळे ती अधिक शक्तिशाली काटक झाली असावी....ज्या
पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानच्या स्वात अफगाण खोऱ्यात दहशदवाद जोपासला
तेच देश आता मलाला यूसुफजई वरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत नार्काश्रू
ढाळत आहेत.........ती लवकर बरी व्हावी या साठी ईश्वर , अल्लाह कडे
प्रार्थना