It happens only in INDIA!!!
It
happens only in INDIA!!!
नवी दिल्ली - चीनचे अध्यक्ष हू जिंताओ हे आजपासून
(बुधवार) भारताच्या दौऱ्यावर आले........ चीन भारताचा नंबर एकचा शत्रू
........ चीनी हिंदी भाई भाई म्हणत नेहरुच्या धोरणाचा फज्जा उडविणाऱ्या
शत्रूचा हा प्रमुख परत एकदा भारतावर वाकडी नजर टाकत आहे ..... अश्या दौऱ्याच्या
कठीण प्रसंगी दिवसभर वटवट करणाऱ्या मिडीयाने दुसरीच बातमी भारताच्या सैन्याच्या मनोबल हानीची गाजवायला सुरु
केली .........ती अतिशय गंभीर बातमी........ लष्करप्रमुख सिंह यांनी
पंतप्रधानांना पत्र लिहून देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे आज संसदेत जोरदार वादळ उठले असून, अनेक प्रमुख नेत्यांनी देशाच्या
सुरक्षेविषयी अशी कुप्रसिद्धी केल्याने सिंह यांच्यावर टीका केली आहे. जनता
दल युनायटेडने सिंह यांनी शिस्त ओलांडली असल्याचे म्हटले आहे...... शत्रू
देशाचे चीनचे अध्यक्ष हू जिंताओ इंडियाच्या भेटीवर आले असताना आपली सैना
कमकुवत झाली असल्याचे ढोल बडविण्याचे काम
फक्त इंडियातच होऊ शकते. आणि त्यावर वेडावाकडा नाच, बेजबाबदार चर्चा
करण्यास इंडिया चे भ्रष्ट्र बेईमान राजकारणी , माजी सैनाधिकारी आणि मिडिया
गिधाडा प्रमाणे टपूनच बसल्या प्रमाणे वागत आहे ...... सरकारची लष्करप्रमुख सैन्याची
बदनामी,बेईज्जती करताना आपण आपली कमकुवत बाजू शत्रू समोर मांडत आहोत याचे
भान हि मिडीयाला राहीले नाही ...विरोधी पक्ष तर भान नसल्या प्रमाणे वागणारा
आणि सरकार तर जणू आपण त्या गावाचे नाही असे दाखवत उलटसुलट चर्चेला
प्रोहस्थान देत आहे......आणि शत्रूला लाल गालिच्याच्या पायघड्या घालत आ
बैल मुझे मार म्हणत आहे ...... सौ में निन्यानवे बेईमान फीर भी मेरा देश महान
म्हणण्यास आपण मोकळे.......खरच आपला देश कसा चालतो याची ब्रम्ह देवाला
सुद्धा काळजी वाटत असेल.......... कींवा त्याने काळजी करण्याचे सोडून दिले असेल ....... अपने हाथ खून से नहीं रंगना चाहता: एंटनी.....
हे आहेत आपल्या अहिंसावादी देशाचे संरक्षण मंत्री........
No comments:
Post a Comment