Translate

Friday, March 2, 2012

पुणे तेथे काय उणे........

 
......हे आहे इंडिया च्या विकासाचे खरे चित्र..... किंबहुना विकास कसा करू नये याचे हे ज्वलंत चित्र. पुणे (आनंदनगर, सिंहगड रस्ता) - शहराला होणाऱ्या एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे मोठमोठ्या सोसायट्यांसमोरही आता टॅंकर दिसू लागला आहे. सन पॅरेडाईज इमारतीसमोर शुक्रवारी घेतलेले छायाचित्र. पुणे तेथे काय उणे अशी ख्याती असलेल्या जनतेचे पाण्यासाठी हे हाल आहेत... गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्व धरणे १०० टक्के भरल्याने आनंदात असलेल्या पुणेकरांच्या तोंडचे पाणी पाचच महिन्यांत पळाले आहे. उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसताना महापालिकेने पाणीकपात लागू केल्याने आतापासूनच पुणेकरांना पाण्याचे चटके बसू लागले आहेत.... निवडणुकांच्या  आधी धोधो वाहणारे पाणी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीनंतर कसे काय आटले? याचे उत्तर अजून तरी पुणेकरांना मिळालेले नाही. तर खेड्यातील जनतेचे पाण्या साठी काय हाल होत असतील ??हे मेरा भारत महान चा नारा देणाऱ्या भ्रष्ट्र राजकारणी नेत्यांना कधीच  समजणार नाही.....

No comments: