Translate

Thursday, November 25, 2010

पैसा सर्वस्व नाही...!

पैसा सर्वस्व नाही...!

1923 मध्ये जगातील आठ सर्वात श्रीमंत व्यक्ती एकत्र भेटल्या.त्यांची एकत्रित संपत्ती;त्या वेळच्या अमेरिकन सरकारच्या संपत्तीपेक्षा अधिक होती,असा अंदाज होता.अर्थातच संपत्ती कशी कमवायची,हे या लोकांना चांगलं माहीत होतं.पण 25 वर्षाँनंतर त्यांचं काय झालं ते पहा.

1.पोलादनिर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचा अध्यक्ष चार्ल्स श्वाब उधार भांडवलावर 5 वर्षे जगला आणि नंतर दिवाळखोर होऊन मरण पावला.
2.सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीचा अध्यक्ष हॉवर्ड हब्सन याला वेड लागलं.
3.सर्वात मोठा व्यापारी आर्थर क्युटन दिवाळखोर होऊन मेला.
4.न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा अध्यक्ष रिचर्ड व्हिटनी याला तुरुंगात जावं लागलं.
5.आयुष्याचे शेवटचे दिवस घरी घालवायला मिळावे,म्हणून अमेरिकेच्या मंत्रिमंडळाचे एक सदस्य अल्बर्ट फॉल यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.
6.वॉल स्ट्रीटवरचा सर्वात मोठा शेअरदलाल जेसी लीव्हमोर याने आत्महत्या केली.
7.काडेपेटीच्या उत्पादनात जगात आपली मक्तेदारी निर्माण करणारे आयव्हर क्रूगर यांनी आत्महत्या केली.
8.'बॅँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेँट'चे अध्यक्ष लिऑन फ्रेझर यांनी आत्महत्या केली.
(संदर्भ-शिव खेरा यांचं 'यश तुमच्या हातात')

2 comments:

Mihir said...

थोडक्यात म्हणजे हे विसरून चालणार नाही कि, पैसा हा माणसा करता आहे... माणूस पैश्या करता नाही!!
पैसा हा माणसांनी वापराय करताच आहे... परंतु आज पैश्या करता माणूस वापरला जातो..
वर्तमानाचं दुर्दैव..

THANTHANPAL said...

पण आजच्या बाजारू मार्केटिंग च्या जाहिरात युगात हे लक्षात कोण घेतो.???