Translate

Friday, July 30, 2010

हात खाली है मगर ब्यापर करताहुं ....


भारत-बांगलादेशात ऐतिहासिक वीज करार
(28-07-2010 : 12:45:11) लोकमत ढाका, दि. २७ : बांगलादेशाने भारताकडून २५० मेगावॉट वीज आयात करण्यासाठी ३५ वर्षांच्या वीज वहन (ट्रान्समिशन) करारावर स्वाक्षरी केली. विजेची आयात २०१२ च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने भारताच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.बरोबर करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमध्ये ५०० मेगावॅट विजेची देवाणघेवाण करण्यासाठी ४०० के.व्ही. डबल सर्किट लाईन यंत्रणा उभारून तिचे कार्यान्वन व देखभालीची जबाबदारी भारतावर राहणार आहे. वीजवहनाचे भाडे नंतर ठरणार असून, बांगलादेश ते दरमहा भरणारा आहे.
हात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या. भारतातच अजून १०-१५ वर्ष वीज टंचाई राहणार आहे,आजच देशात मुंबई वगळता सगळी कडे १०-१५ घंटे लाईट नसते. देशाच्या राजधानीत दिल्लीत सुद्धा लोड शेडीग आहे. कारण आपल्या कडे वीजच नाही आणि आपल्यालाच पुरेल एव्हडी वीज निर्माण करण्यास अजून ५-१० वर्ष लागतील. याचाच अर्थ कोठेतरी पाणी मुरतेय असा होतो. एकीकडे वीज नाही असे माहोल करून अमेरिके बरोबर महागडा वीज करार, कोणत्याही सुरक्षतेच्या हमी शिवाय देशाच्या गळ्यात मारावयाचा आणि दुसरीकडे वीज नसताना वीज निर्यात करार विजेचे दर न ठरवता करायचा हे अनाकलनीय आहे. भारतात विजेचा दुष्काळ असताना विजेची बांगलादेशात निर्यात करण्याचा करार करणे या बाबत आहे. संपूर्ण भारतात वापरून वीज निर्यात करण्या एव्हढी आपली क्षमता असेल तर १) अमेरिके बरोबर अणुकरार करण्याची गरज होती का? २) आणि वीजच नसेल तर बांगला देशाला वीज निर्यात करार करण्याची काय गरज? ३).आणि वीज निर्यात होत असेल यार भारतात लोड शेडीग का? शासनाच्या विविध मंत्र्यांच्या खात्यात ताळमेळ नाही का?कोणास हे गणित सुटत असेल तर आवश्य माहिती द्यावी
REACTION IN BANGLADESH
BNP Secretary General Khandaker Delwar Hossain said
t‘An evil omen has hung over the country to prevent it from becoming a self-reliant nation,’ he told media.He announced a mass procession in the national capital Aug 9 as part of its anti-government movement, the newspaper reported.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

2 comments:

Anonymous said...

BAROBAR AHE TUZ.....
hya goshti honyala ani karayla Polical party ni setting keli asnar..... tyashivay kuthe he shakya ahe....
shivay sarv dharm sambhav ... hya uddeshane Hindu na electricity nahi milali tari chalte pan.....??????????????????

Anonymous said...

टायटल एकदम परफेक्ट व इनोवेटिव आहे...मस्तच..
विजेच्या बाबतितली दुसरी बाजू(बांगला देशची) माहीत नव्हती किंवा एवढा विचारही कधीच केला नव्हता..तुमच्यामुळे समजली...सगळी नुसती बोंबाबोंब आहे.