गुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .
पूर्वीच्या काळी शिक्षणाचा आजच्या सारखा बाजार झाला नव्हता. शिक्षण देणे हे पवित्र सामाजिक बांधिलकीचे कार्य समजून केले जात होते. त्याकाळी गुरुजना प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक दीवस त्यांची आदराने पूजा केली जात असे. पण आज काळ बदलला आहे. शाळे पासून ते विविध कला संगीत नृत्य गाणे खेळ हे शिक्षण बाजार झाला आहे. पैसा फेक तमाशा देख असे याही क्षेत्रा चे झाले आहे. पैसा नसेल तर शिक्षणाची कवाडे बंद होतात. शिक्षक ही पूर्वी सारखे सेवाभावी वृतीने काम करत नाही . पुरातन काळी ही हेच चालत होते. आपल्या श्रीमंत शिष्या साठी गरीब मुलाचा चा त्याला कांही न शिकवता स्वतः:च्या अक्कल हुशारीने शिकलेल्याचा गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापणारे गुरु होतेच. पण सामाजिक व्यवस्थे मुळे अज्ञाना मुळे गुरुचे हे पाप झाकल्या गेले
पैश्या वर आधारीत शैक्षणिक डोलारा उभारल्या मुळे पालक, विद्यार्थ्याचा शिक्षका प्रति आदरभाव सुद्धा कमी झाला आहे. आंणी आध्यात्मिक गुरु बद्दल तर बोलणे म्हणजे घाणीत दगड टाकणे आणि आपल्याच अंगावर घाण उडवून घेणे असा प्रकार झाला आहे.गुरुपोर्णिमेच्या नावाखाली करोडो रुपये लाटले जात आहे. याचा कांही हिशोब नाही. सर्व काळा पैसा यामुळे INCOME TAX ,SALES TAX ही नाही. आणि भावनेचा प्रश्न असल्या मुळे मतांच्या राजकारणा करता सरकारही या उत्पना वर पाणी सोडते या मुळे या गुरु पौर्णिमेला किती महत्व द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज नेमाडे म्हणतात तसे हा उत्सव म्हणजे हिंदू समाजातील एक अडगळ ठरणारा आहे .
- Show quoted text -
No comments:
Post a Comment