Translate

Saturday, March 27, 2010

चला विठ्ठला ! आता तू सुद्धा श्रीमंत तिरुपती ,original शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला

चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,original शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला.आनंद झाला. गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती (duplicate)  आहेत हे आम्हाला माहितच नव्हते शिर्डी संस्थानाने ते जाहीर केले. मंदिरे नकली असतात पण देवा आमच्या श्रद्धा तर असली आहेत ना! इतके दिवस आम्हाला लाजल्या सारखे होत होते. जशी मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात केविलवाणी उभी राहते तसा तू जुन्या विटेवर युगा युगा पासून उभा आहे.आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील 

आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील लवकरच बडवे आमचाच विठ्ठल खरा आहे असे जाहीर करतील  दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या .असे जाहीर कर म्हणजे रोज लाखोंची गर्दी पंढरपुरात होईल गर्दी साठी पंचतारांकित हॉटेल्स पब मैयखाने उभी राहतील राहिला आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.

--


1 comment:

Ninad Pradhan said...

मी गेले काही दिवस आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण माझ्या marathisrushti.com या वेबसाईटवर काही लिखाण केले आहे. त्याबद्दल काही महत्त्वाचे बोलायचे आहे. कृपया संपर्क साधावा.

pradhan@vsnl.com

pradhan2000@gmail.com

Cell: 09820310830