महाराष्ट्रातील
प्रसिद्ध शिक्षण संस्थेला त्यांच्या संस्थेच्या विविध शाळां मध्ये
मुख्याध्यापक/ प्रिन्सिपाल यांच्या नेमणुका करावयाच्या आहेत . बालवाडी ते
बारावी पर्यंत वर्ग असलेल्या आणि सरासरी दोन हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इंग्रजी बहुभाषिक शिक्षण घेत असलेल्या या शाळां मध्ये कायम स्वरूपी या नेमणुका साठी पुढील पात्रता असणाऱ्या उमेदवारां कडून online अर्ज मागविण्यात येत आहेत .
१) शिक्षण: कोणती ही पोस्ट ग्रैजुऐट पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण . खास करून खाद्य फुड , सेक्युरिटी , क्षेत्रातील विषयात प्राविण्य,अनुभव असलेल्याना प्राधान्य .
२) नेमणूक झालेल्या मुख्याध्यापकांना पुढील अशैक्षणिक कामे करणे बंधनकारक आहे.
a
) मुख्याध्यापकाना शाळे तील विद्यार्थ्यां च्या दुपारच्या भोजनाची संपूर्ण
व्यवस्था करावी लागेल . भोजन शिजविणे , स्वयंपाकाचे साहीत्य जमा करणे ,
इंधन ची सोय , पिण्याच्या पाण्याची सोय करणे , जेवणावळी च्या पंगती उठवणे
इत्यादी कामे करावी लागतील . संस्था चालकांनी ठरवून दिलेल्या दर्जा चे पालन
करत विद्यार्थ्याना विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल .
विषबाधा
झाल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाईल , आणि त्यावर कायदेशीर कार्यवाई
करण्यात येईल . हे लक्षात ठेवावे .
b ) शाळेतील दोन हजार विद्यार्थी /
विद्यार्थींनी च्या घर-शाळा-ते घर या दुहेरी मार्गाच्या वाहन वाहतुक
व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी या मुख्याध्यापकांची असेल . या वाहतुकीच्या
बसेस ची व्यवस्था करणे , बस चालक वाहक यांच्या चालचलन ,वर्तुणूक, शिस्त
याची संपूर्ण देखभाल करणे . बसेसच्या इंधन/ऑंईल-पाणी, साफ सफाई , वार्षिक
परवाना, वाहतूक पोलिस नियम यांची संपूर्ण जबाबदारी यांची राहील .
मुख्य म्हणजे बस मध्ये
विद्यार्थी/विद्यार्थींनीन वर लैंगिक अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेणे
, यासाठी बसेस मध्ये CCTV कॅमेरे बसविणे , ते चालू राहतील याची दक्षता
घेणे , कार्यालयातील पडद्या वरून या कॅमेरया द्वारे बस मधील हालचालीवर
नजर ठेवणे , कांही अत्याचार होत असेल तर त्वरित हालचाल करून हा प्रसंग
रोखणे . जर बस मध्ये कांही लैंगिक अत्याचार झाला तर मुख्याध्यापका वर
कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल.
c ) शाळा चालवत असतांना संस्था चालकांनच्या
आर्थिक हितसंबंधास बाधा येईल असे निर्णय मुख्याध्यापकास कोणत्याही
परिस्थितीत घेता येणार नाहीत. त्याच बरोबर प्रवेश डोनेशन चा काटेकोर
हिशोब त्यास ठेवावा लागेल .
d ) निवडणुकीच्या काळात संस्था चालकांच्या
निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून जिंकण्या साठी साम , दाम ,
भेद दंड या सर्व मार्गाचा वापर करण्याची धमक त्याच्यात असावी .
e ) संस्था चालकांच्या विविध सहकारी सोसायटी, कारखाने , बँक यांचे समभाग शिक्षकांना विकण्याची कामगिरी त्यास पार पाडावी लागेल .
f ) संस्थेच्या गोपानियतेला बाधा येणार नाही या बद्दल त्यास दक्ष रहावे लागेल .
g ) माहीती आधारा कायद्याच्या अंतर्गत आलेल्या तक्रारीना पळवाटा काढत माहीती न देता माहीती दिल्याचा देखावा त्यास करता आला पाहिजे .
h) शाळेतील संस्था चालकांच्या नौकरी करणाऱ्या नातेवाईकांना , शिकणाऱ्या विद्यार्थ्याना सन्मानपूर्वक वागणूक त्याने दीली पाहिजे .
i ) सर्वात महत्वाचे म्हणजे पदभार स्वीकारताना त्याला स्व:खुषीने कोऱ्या कागदावर सह्या करून द्याव्या लागतील . त्याच बरोबर राजीनामा लिहून द्यावा लागेल .
वरील सर्व कामे करत असतांना शाळेचा शैक्षणिक
दर्जा उंचावण्याचे आणि विद्यार्थ्याना मेरीट मध्ये उत्तीर्ण करण्याची
परंपरा त्यास पार पाडावी लागेल .
चला तर महान शैक्षणिक कार्यात सहभागी होऊन आपले जीवनमान उच्च करा .