Translate

Wednesday, September 11, 2013

मेडिकल टुरिझम चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'.


मेडिकल टुरिझम  चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'....विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

इंडिया  जागतिक आरोग्य सेवा देणारा जगातील महासत्ता झाला आहे . इंडिया मध्ये मेडिकल टुरिझम उद्योग वेगाने वाढतो आहे . अनेक देशाचे बिमार पेशंट इंडिया मध्ये येवून येथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक असतात . या मुळे इंडिया ला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते . या मेडिकल टुरिझम मुळे विमान कंपन्या पासून ते लहान आटो चालविणाऱ्या चालकास खूप फायदा होतो . असे ढोल इंडिया सरकार रात्रंदिवस बडवत असते …….
पण फक्त या सरकारच्या पक्ष प्रमुखांची तब्बेत मात्र  हि आरोग्य व्यवस्था चांगली राखू शकत नाही . या बिच्च्यारया पक्ष प्रमुखाला स्वतःह वर उपचार करून घेण्या करता परदेशात जावे लागते . लाखो करोडो डॉलर या करता खर्च करावे लागतात ……. या रहस्यमय बिमारी साठी परदेशात वारंवार चक्करा माराव्या लागतात . ही  बिमारी इतकी गुप्त आहे की  ती कोणती आहे??  हे इंडिया मिडीया अजून शोधू शकला नाही .  तर इंडिया चे डॉक्टर तर दूरच राहिले .
आता तर या पक्ष अध्यक्षान बरोबर इंडिया च्या भ्रष्ट्र , बेईमान  नौकरशाहीला खावून खावून बिमार झाल्या वर झालेल्या  स्वतः च्या बिमारीवर सरकारच्या  पैश्या ने इलाज करता येणार आहे . विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

नवी दिल्ली- देशातील सरकारी बाबू आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांवरील परदेशात गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. नव्या नियमांनुसार अधिकाऱ्यांना उपचारांसाठी परदेशी जाण्यासाठी विमानाचे प्रवासभाडेही सरकारकडून देण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था संकटात असतानाही सरकारने अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला आहे.. सर्व वर्तमान पत्रात या बातम्या झळकल्या पण कोणास हि यास विरोध करावा वाटला नाही . नागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या पैश्या वर भरलेल्या  विविध करांचा असा दुरुपयोग करण्याचा या भ्रष्ट्र राजकारण्याना नौकर शाहीला कोणी अधिकार दिला . हेच जर परदेशात बिमारी इलाज साठी जात असतील तर इंडिया टुरिझम शायनिंग चे ढोल बडविले जात आहेत त्याचे काय????  हा सगळा बनाव आहे असेच म्हणावे लागेल . आणि आज या बदमाशी ला जबाब विचारणारा कोणी माई चा लाल सुद्धा नाही . आणि मिडीया चे पत्रकार संपादक आधीच या लुटारूंचे, दरवडेखोरां चे साथीदार झालेले आहेत .

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4736369675042225089&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130910&Provider=-%20%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80%20%27%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%27  

No comments: