कवी लेखकांनी ज्या प्रमाणात आईच्या त्यागाचे प्रेमाचे गोडवे गायिले त्या
प्रमाणात बाप हा प्राणी तसा दुर्लक्षितच राहिला . परंतु बाप नावाच्या
प्राण्याने त्या बाबत कधी हि तक्रार केली नाही , किंवा स्वता:च्या त्यागाचे
प्रदर्शन मांडले नाही... तो आपली कर्तव्य मूकपणे बजावत आलाच आहे....आणि
भविष्यात हि बजावेल यात शंका नाही....वाढत्या बाजारीकरणात उत्सव साजरे करून
आपला माल खपवण्याचा प्रत्येक क्षणी विचार करणाऱ्या कंपन्यांनी या
नातेसंबंधाचा सुद्धा बाजार मांडत मार्केट मध्ये आपला माल खपवणे सुरु केले.
त्यामुळे मग विविध नातेसंबंधाचे उदात्तीकरण करत त्यांच्या नावाने दिवस
साजरे केले जाऊ लागले....आणि या दिवशी जर तुम्ही या नातेवाईकांना शुभेच्छा
नाही दिल्या तर तुमचे या नात्या बद्दल प्रेमच नाही असे मनावर बिंबवण्यास
सुरु केले.....
.... पण मदर्स डे ला जे ग्लमरस लाभले ते बिचाऱ्या फादर्स डे ला
मात्र लाभले नाही..... मदर्स डे ला ज्या प्रमाणात FB किंवा इतर साईट वर
आईच्या महानतेच्या प्रेमाच्या त्यागाच्या कॉमेटस चा महापूर वाहत असतो तसा
आज फादर्स डे ला मात्र वाहताना दिसत नाही.....आई च्या तुलनेत बापाची महती
मुलांना कळलीच नाही असे मानावे लागेल.....पण तसे कांही नाही असे डे साजरे
करून प्रेम दाखवण्याची त्याचा बाजार करण्याची गरज नाही.....त्या करता
पिढ्यानपिढ्या त्याग करून संसार उभा करावा लागतो.....मुलांवर चांगले
संस्कार निरपेक्षपणे करावे लागतात हे भारतीय आई आणि बापाला चांगले ठाऊक
आहे....आणि त्या बद्दल ते मुलां कडून कांही अपेक्षा हि बाळगत
नाही.......त्या मुळे अश्या डे च्या शुभेच्छा कडे ते निरपेक्षपणे पाहतात
आणि जीवनाची वाटचाल करत राहतात. त्या आई बाप या दोघांना सलाम !!!!!!!!
No comments:
Post a Comment