Translate

Friday, June 22, 2012

..मग सीएमसाहेबांचं चेंबर वाचलं कसं?- दादा

...........बरोबर आहे...अजित पवारांचं म्हणन.....पण काय जाळायचं आणि काय जाळायचं नाही त्या अग्निदेवतेला चांगलाच माहित असाव .......नीरउपद्रवी , अकार्यक्षम निर्णय न घेणाऱ्या बाबांच्या कार्यालयात जाळण्या सारख काय असणार आणि सर्वच जाळले तर या राज्याचा गाडा कसा आणि कोठून चालवला जाणार हा प्रश्न विचारात घेऊन अग्नीने बाबांचं कार्यालय बहुदा जाळले नसावे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14335584.cms ...मग सीएमसाहेबांचं चेंबर वाचलं कसं?- दादा
'मंत्रालयाचा चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्ण जळलाय... माझं संपूर्ण दालन, मंत्रिमंडळ बैठकीचा हॉल, कॉन्फरन्स हॉल, व्हिजिटर्ससाठी असलेला कक्षही खाक झालाय... मग सीएमसाहेबांचं चेंबर कसं सुरक्षित राहिलं?, याचं मला आश्चर्यच वाटतं... तिथे एवढं काहीच झालेलं नाही...' हे उद्गार आहेत, अजित पवार यांचे..........

Thursday, June 21, 2012

उशिरा मध्यरात्री बाबाना या आगीचे मैनेजमेंट कसे केले? असे विचारणारा फोन......

मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगी नंतर मुंबईतील राजकीय वातावरणा बरोबरच बिल्डर लोबी हि सक्रीय झाली असून या आगीचा फायदा करून घेत आपली राजकीय आर्थिक पोळी भाजून घेण्याची सर्वांची धडपड सुरु झाली आहे....

मुख्यमंत्री हे अकार्यक्षम असल्या मुळे हि आग लागल्याची भीषण घटना असून या मुळे महाराष्ट्राची मान खाली झाली आहे........त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात येऊन नवीन मुख्यमंत्री नेमण्यात यावा या करता मुख्यमंत्री विरोधी गट सक्रीय झाला आहे...नवीन मुख्यमंत्री अजित  दादना आणि राष्ट्रवादीला  पुरून उरणारा असला पाहिजे असे हि प्रयत्न सुरु झाले आहेत......

त्याच बरोबर या आगी मुळे मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम म्हणणाऱ्यांची तोंडे आपोआप बंद झाली आहेत.....या आगीत जळलेल्या फाईली मुळे कॉंग्रेस चा प्रचंड फायदा झाला असून याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.....म्हणून दिल्ही ने पृथ्वीराज चव्हाणांचे हाथ मजबूत करावेत अशी मागणी मुख्यमंत्री गोटा तर्फे करण्यात आली.......

तर शिवसेनेने हे आगीचे  पाप, षड्यंत्र  कॉंग्रेसचेच  आहे असा आरोप करत २०१४ मध्ये हे आगलावे भ्रष्ट्र कॉंग्रेसचे  सरकार हाणून पाडण्याचे आव्हान मराठी जनतेला महाराजांच्या ,  आई अंबाबाई च्या साक्षीने केले......

या मागे  मंत्रालयातील बिहारी UP वाल्या नौकरशाही भय्यांचा  नक्कीच हाथ आहे.... तर म्हणून म्हणतो बाबानो आता फसू नका......मला माझ्या मनसेला मत द्या....आर्धी सत्ता नको ...पूर्ण बहुमत द्या........मग पाहतो आगी कश्या लागतात? ते.......माझ्या महाराष्ट्रतात आगी न लागण्याची मी ब्लू प्रिंट च तय्यार केली आहे.....सत्तेत आलो की ती मी राबवणार आहे.........

या आगी मागे पाकिस्थानी अंतकवाद्यांचा हाथ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....त्या दिशेने पोलीस तपास चालू झाला असून मुंबईत रेड अलर्ट जारी केला गेला आहे......देशातील सर्व लोकशाही मंदिरांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.......नागरिकांनी शांतता पाळावी डगमगून जावू नये असे आवाहन मुंबई कमिशनर यांनी केले.......

रामदास आठवले यांनी ही आग लागलेली मंत्रालयाची नवीन इमारत येथेच पुन्हा न बांधता नवीन ठिकाणी बांधावी ...आणि या जागी बाबासाहेबांचे स्मारक उभे करावे अशी जोरदार मागणी केली आहे....लवकरच ते या जळलेल्या मंत्रालयावर धडक मोर्चा नेणार आहेत.........

मंत्रालय मेकओव्हरचे काम एका खाजगी बिल्डरकडून करुन घ्यायचे व त्या बदल्यात त्याला मंत्रालयासमोरचा मोठा भूखंड देण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र,  उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी प्रत्येक विभागाने किमान पाच कोटी दिले तरी मंत्रालय चकाचक होईल असे सांगून मेकओव्हरच्या प्रस्तावातली हवाच काढून घेतली होती . या मुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी या आगीचे मनातल्या मनात स्वागत केले.....आणि नव्या उमेदीने संपूर्णच नवीन मंत्रालय बांधण्याचा हजारो कोटीचा प्रस्ताव आपल्या सुनांच्या मालकीच्या कंपनी मार्फत सरकारला सादर करण्याचे ठरविले......

हा प्रस्ताव प्रकल्प आपल्यालाच मिळावा म्हणून बिल्डर्स लॉब्या सक्रीय झाल्या असून या दृष्टीने आपल्या मार्गात धोंडा असणाऱ्या बाबांना हटविण्यास जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत......मुख्यमंत्रीपदी अशोकराव किंवा विलासराव हेच आदर्श मुख्यमंत्री असावे असे पक्के झाल्याचे समजते.........

उशिरा मध्यरात्री बाबाना या आगीचे मैनेजमेंट कसे  केले? आणि याचा उपयोग महापालिकेच्या जुन्या झालेल्या इमारतीत करता येईल का ? असे  विचारणारा फोन मातोश्री च्या परिसरातून आला होता अशी पत्रकारात चर्चा आहे.....

मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-

http://www.thanthanpal.blogspot.com

Sunday, June 17, 2012

फादर्स डे

कवी लेखकांनी ज्या प्रमाणात  आईच्या त्यागाचे प्रेमाचे गोडवे गायिले त्या प्रमाणात बाप हा प्राणी तसा दुर्लक्षितच राहिला . परंतु बाप नावाच्या प्राण्याने त्या बाबत कधी हि तक्रार केली नाही , किंवा स्वता:च्या त्यागाचे प्रदर्शन मांडले नाही... तो आपली कर्तव्य मूकपणे बजावत आलाच आहे....आणि भविष्यात हि बजावेल यात शंका नाही....वाढत्या बाजारीकरणात उत्सव साजरे करून आपला माल खपवण्याचा प्रत्येक क्षणी विचार करणाऱ्या कंपन्यांनी या नातेसंबंधाचा सुद्धा बाजार मांडत मार्केट मध्ये आपला माल खपवणे सुरु केले. त्यामुळे  मग विविध नातेसंबंधाचे उदात्तीकरण करत त्यांच्या नावाने दिवस साजरे केले जाऊ लागले....आणि या दिवशी जर तुम्ही या नातेवाईकांना शुभेच्छा नाही दिल्या तर तुमचे या नात्या बद्दल प्रेमच नाही असे मनावर बिंबवण्यास सुरु केले.....

.... पण मदर्स डे ला जे ग्लमरस लाभले  ते बिचाऱ्या फादर्स डे ला मात्र लाभले नाही..... मदर्स डे ला ज्या प्रमाणात FB किंवा इतर साईट वर आईच्या महानतेच्या प्रेमाच्या त्यागाच्या कॉमेटस चा महापूर वाहत असतो तसा आज फादर्स डे ला मात्र वाहताना दिसत नाही.....आई च्या तुलनेत बापाची महती मुलांना कळलीच नाही असे मानावे लागेल.....पण तसे कांही नाही  असे डे साजरे करून प्रेम दाखवण्याची त्याचा बाजार करण्याची गरज नाही.....त्या करता पिढ्यानपिढ्या त्याग करून संसार उभा करावा लागतो.....मुलांवर चांगले संस्कार निरपेक्षपणे करावे लागतात हे भारतीय आई आणि बापाला चांगले ठाऊक आहे....आणि त्या बद्दल ते मुलां कडून कांही अपेक्षा हि बाळगत नाही.......त्या मुळे अश्या डे च्या शुभेच्छा कडे ते निरपेक्षपणे पाहतात आणि जीवनाची वाटचाल करत राहतात. त्या आई बाप या दोघांना सलाम !!!!!!!!