Translate

Sunday, December 27, 2009


मार्केटिंग च्या या जगात, देवाच्या नावाखाली जनतेला लुबाडले जात आहे.आणि हे कटू सत्य सांगितले तर आमच्या श्रद्धेवर घाला घातला म्हणून (भक्त नाही) तर देवाचे दलाल ओरड करून सांगणाऱ्याचा निषेध करणार . धार्मिक स्थळे हि मोजमज्जा ( सभ्य भाषेत) करण्याची ठिकाणे झाली आहेत. अशी मंदिरे उभारून लोकांच्या अंधश्रद्धेचा गेरफायदा घेऊन गावोगाव हस्तक नेमून नवस केल्या वर कसा फायदा होतो याचा नियोजितपणे प्रचार केला जातो.भक्त येवू लागले म्हणजे मग पंचतारांकित सुखसोयी येतात, या सोयी आणि देव एकाच पकेज मध्ये मिळाल्यावर गर्दी होते. आपण कधी गंगा नदीवर गेला असाल तर आपणास याचा प्रत्यय येईल . पवित्र गंगेत स्नान करत असताना तेथील पुजारी आपल्या न कळत मोबाइल वर चित्रण करत असतात.देवाच्या पुजारयाला दलालाला  ब्लैक मनी दिल्याशिवाय देवाचे दर्शन होत नाही. असे दर्शन त्या देवाला आवडत असेल का? शनि मागे लागला हें ऐक असेच भोळ्या जनतेला, भक्ताला  फसवीण्याचे राजरोस साधन. शनिला देव मानल्या जाते.मग  देव भक्ताला का परेशान करेल, त्रास देईल . याचा कोणी विचारच करत नाही. मग रोज हजारो किलो तेल वाया घालवले जाते. आणि गणिताचा विचार केला तर सेकंदाला ऐक भक्ताचे दर्शन झाले तर 86400 भक्ताचे दर्शन ही होत नाही, यात देवाच्या आरामाचा,पूजेचा वेळ पकडला नाही , देव 24 तास काम करतो हा हिशोब धरला.तर मग 24 तासात २ ते ३ लाख भक्त कसे दर्शन घेतात आपणच हिशोब करा .

Friday, December 25, 2009

आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!!,मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही ,



कोंबड कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच. त्या न्यायाने मुंबईचे कितीही मेकअप केले तरी मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा  लपणार नाही , हेच या पाण्याने दाखऊन दिले. आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!! त्याला अंधारात लोटून  मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि राजकीय स्वार्थात मुलभूत सोई कडे दुर्लक्ष झाले. त्याचा हा  परिणाम आहे.याला कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा तेव्हढीच जबाबदार आहे. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हाम्हारा..!! असा महानगर पालिकेत कारभार चालू आहे. या वर बोलणे हा गुन्हा आहे . आणि जे बोलतात तेही राजकीय फायद्या साठी . जनतेचे कोणालाही कांही देणे-घेणे नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्ना कडे लक्ष देण्या ऐवजी रेल्वे चा पाणी पुरवठा कमी करण्याचा महंमद तुघलकी निर्णय घेऊन सरकार आणि नोकरशाही मोकळी झाली आहे.या पेक्षा वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत . पंचतारांकित होटल चा पाणी पुरवठा कमी करावा.

भारतीय रेल्वे मध्ये सामान्य डब्ब्यात बसून या निर्णय घेनारया माणसांनी कधी प्रवास केला होता का? आधीच बकाल अस्वछ आसलेल्या डब्ब्यात नाक मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आत्मःहत्या कराव्यात हाच सरकारचा उद्देश असावा यामुळे लोकसंख्या  ही कमी होईल.  महाराजांच्या काळात असा निर्णय घेतला गेला असता तर ... महाराजांनी आख्या मंत्री मंडळा सह नोकरशाहीस हत्तीच्या पायाखाली शिरच्छेदाची शिक्षा दिली असती व अपील करण्याची पळवाट न देता ताबोडतोब  अमंलात आणली असती . जय महाराष्ट्र !!!


Thursday, December 24, 2009

आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने.......


माझा भारत महान आहे.पण तो महान आजच्या 3 पेज वर चमकणाऱ्या क्रिकेट खेळाडू, फिल्मी नट-नट्या किंवा आपल्या राजकारणी नेत्या मुळे नव्हे, 100 स्रीया बरोबर लग्न करून प्रेमाचा आव आणणाऱ्या  ताजमहल बांधणाऱ्या आणि काम झाल्यावर कारागिरांचे हात तोडणार्या  राजा मुळे तर नव्हेच नव्हे .तर स्वर्गातून गंगा पृथ्वी वर आणणाऱ्या भगीरथ , अजिंठा , वेरूळ चे पहाड खोदून त्यावर नावाची साधी पाटी न लावता कर्म करणाऱ्या कारागीरा मुळे भारत महान आहे
महात्मा फुले. बाबासाहेब आबेडकर,योगी विवेकानंद , बाबा आमटे , मेधा पाटकर, आणि इतर अनाम अज्ञात  सामान्य माणसा मुळे माझा भारत महान आहे. आज अश्याच एका अवलियाची गोष्ट आहे .बिहारी भारतीयाने  आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने  आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने फोडून गावकऱ्या साठी बोगदा ३५० फूट लांब १६ फूट रुंद आणि १२ फूट उंच अशा आकाराचा कल्पनाही करू शकत नाही असा तयार केला.

Wednesday, December 23, 2009

असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असता तर हत्तीच्या पायाखाली चिरडले असते,


 Is Maharashtra Govt hiding something?
भ्रष्ट नोकरशाही, मुजोर राजकारणी हे मुंबई वरील हल्ल्या कडे किती गंभीरपणे पाहत आहे हे स्पष्ट होते. बायो मेडिकल कचरा हा इतरवेळी रस्त्यात पडलेला असतो , तेंव्हा कोणी तो लवकर उचलत नाही. आणि आता आपल्या पापावर चादर टाकण्या साठी बायो मेडिकल कचरा हि शुद्ध थाप मारून वेळ मारून नेत आहे. असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असतातर महाराजांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री सकट सर्व पोलीस अतिमहत्वाच्या अधिकार्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, आणि त्यांची मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली असती. पण त्या काळात ......  असे कांही करण्याची शत्रूची  हिम्मत झाली नसती.

Friday, December 11, 2009

भारत रत्न विनायक दामोधर सावरकर भारतीय आदर्श

                                                                 नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
                                  प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी  

सरकारने जरी सावरकरांना भारत रत्न दिले नसले तरी वाईट वाटण्याचे कांही कारण नाही. आपण भारत रत्न ची यादी पहाल तेंव्हा;आपणस कळून येईल की J.R.D. टाटा आणि  इतर 2 - 4  नावे सोडली तर सर्व नावे केवळ राजकीय फायद्या साठीच निवडली गेली आहेत. उद्वेगाची गोष्ट म्हणजे सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकराना स्वातंत्र्या नंतर ४३ वर्षांनी  सरकारने नाईलाजाने जनमताच्या प्रखर दबाब मुळे गोंरवले. यामुळे आपणच सावरकरांना भारत रत्न हा संम्मान देऊ ; या करता या सरकारच्या परवानगीची गरज नाही 

Wednesday, December 9, 2009

जनताको खाने को अनाज मिले या ना मिले , अनाज से शराब की ईकाया लगते चलो .


जनताको खाने को अनाज मिले या ना मिले , अनाज से शराब की ईकाया लगते चलो .
शराब की गटारे बहाते चलो , जनता को शराब की गटर में डुबोते रहो. २


कोन है छुत कोन हें अछुत , सब  में पैसा ही समाया है,
सत्ताधारी  और विरोधी  ये सब  झूठे भरम है सारे, इस झूठे भरम में जनता  भरमाई हें , २
झूठे आश्वासन झूठे विकास की  खाब्बों का अभास करवाते रहो .
शराब की जय जय करते रहो . २


सारे अनाज के कण कण में है , दिव्य सोमरस की मात्रा
इक वाइन है ,दूसरी हें देशी ,  सबकी नशा ही समाधी हें
भूके पेट नशे की समाधी लगाते रहो .
जिंदगीके सब गम मिटाते रहो
जनता को जाम पे  जाम पिलाते रहो . जय हो जय  हो !!!!!

Tuesday, December 8, 2009

राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते याचे दुख: जास्त..... ,


मोहाच्या फुला पासून दारू,ज्वारी,बाजरी अन्न धान्य यांचे पासून दारू असे क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार जगात गेल्या 10000 वर्षात झाले नाही. या निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारचे नाव वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकार्डस मध्ये ताबोडतोब सामील केले गेले पाहिजे.
मोर्च्या ने पाव रोटी धान्य मागायला आलेल्या जनतेस  फ्रांस च्या उर्मट राणीने जनतेला पाव भेटत नसेल तर केक खा असे उत्तर दिले दिले. त्या नंतर जनतेच्या रागाचा उद्रेक झाला , अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. आणि जग प्रसिद्ध फ्रेंच राज्य क्रांती झाली.त्यात राज घराण्याचा  शिरच्छेद झाला.राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते , ती तर तोंडात सोन्याचा चमच्या घेवून जन्मली होती.
पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते 
याचे दु:ख जास्त आहे . हे धक्का:दायक चीड आणणारे आहे. हे  राजकारणी नेते इतिहासा पासून  कांही अक्कल शिकले नाही, असे वाटते. माझे  मना बन दगड..... या घाणी चेच खत होईल. असे झाले तर सरकारने असेच निर्णय  घ्यावे व क्रांतीचा मार्ग मोकळा करावा हीच आपण प्रा र्थ ना करू शकतो.
शराब की बोतल से जिन्न निकला
और उस नेता  से बोला  
-”हुकुम मेरे आका!
आप जो भी मुझसे मंगवाओगे
वह ले आउंगा
बस शराब की बोतल नहीं मंगवाना
वरना मुझसे हाथ धोकर पछताओगे..... मगर फिर भी नेताजी नही माने और शराब बनाने की ठान बेठे ... देखो आगे आगे होता हें क्या ?
??               

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Sunday, December 6, 2009

माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.







आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना. कोटयावधी बालकांना गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल
करावयाला लावणारा असा हा  भारत सरकारचा बाल कामगार विरोधी कायदा आहे. बाल कामगाराच्या हीता करता काहींचं नाही करता फक्त बालकाना कामावर न ठेवण्याचा  कायदा करून आणि कामावर ठेवल्यास मालकांना जेल मध्ये टाकण्याचा,त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावण्याचा  अजब कायदा करून   सरकार, राजकारणी नेते आणि नोकरशाही आपण बाल कामगाराच्या सर्व समस्या दूर केल्याचे आणि आपण बालकाचे मुलांचे हित पाहत असल्याचे ढोल पिटत आहे. पण वास्तवात हा कायदा नोकरशाहीच्या भ्रष्ट्राचाराला आधिक वाव देत आहे. पण शासन बुद्धीजीवी वर्ग वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आणि बालक काम करून घराची चूल पेटण्यासाठी राबत आहे. हेच दाहक सत्य आहे. आणि शासन यंत्रणा वार्षिक 
श्राद्धा  प्रमाणे बालकामगार दिवस "आमच्या विभागात बालकामगार नाहीत" अश्या पाट्या लाऊन साजरा करतात. 

रेल्वे ने प्रवास करत असताना स्
टेशन वर अनेक पदार्थ मिळतात . का सेलू स्टेशन वर चणे गरमागरम मिळतात. गरीब चणे खात असेल तर ,देखो घरमे खाणे को मिलता नही स्टेशन पर चणे खा राहा आणि  श्रीमंत माणूस तेच चणे खात असेल तर देखो शौक से चणे खा राहा है. चणे तेच पण खाणाऱ्या च्या सामाजिक दर्जावर खाण्याचा दर्जा ठरत असतो. या वरून बालकामगार  ही सामाजिक  दर्जावरून वर्ग ठरवले जातात . घरी चूल पेटावी घरच्यानन च्या पोटात दोन घास जावे , भावंडाना शिक्षण घेता यावे , आजारी मात्या-पित्याच्या आजारपणासाठी औषधा करत मदत व्हावी म्हणून हि कोवळी बालक काम करत असतात. तेंव्हा समाज यांचे कोतूक करावयाचे सोडून आपला बुद्धिवाद पाजळत बसतात. आणि बालकामगार समाजाला कलंक आहे असे सांगत हे बंद करण्या करता कायदे , अधिक कडक कायदे करत बसतात.


तेच उच्चभ्रू , मध्यम  समाजातील मुल, मुली अभ्यास सोडून रियालिटी शो च्या नावाखाली टी.व्ही वर वेडे वाकडे तोडक्या कपड्यात सरक्यालो खटीया १२ बजे असे विचित्र गाणे घाणरडे हावभाव करत असतात; कमरे खालचे विनोद सांगत असतात ,  तेंव्हा हेच उच्च वर्ग , या बाल कलाकार उर्फ बाल कामगार याचे कोतूक करत असतात. या कलाकारांना बाल मजदूर ,कामगार म्हणतो  म्हणून दचकलात? हां हे बाल कलाकार १००% बाल कामगार आहेत हे  विदारक  कटू सत्य आहे. नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार  8 - 10  तास  चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर  खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते.  त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच. पण आजच्या उपोभोगवादी, बाजारू संस्कृतीत या कडे कोणाचेच लक्ष जात नाही, कारण बाजारू संस्कृतीत बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांहा तो हर चीज बिकती है हेच सत्य आहे . यामुळे  या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.हीच या मुलांची म्हणण्या पेक्षा आपल्या समाजाची शोकांतीका आहे.मुख्य गोष्ट आज जगात 22 - 23 कोटी बाल कामगार काम करत आहेत. विषम सामाजिक, आर्थिक परिस्थिती मुळे, बाजारू अर्थ व्यवस्थे मुळे ;  जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी  शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. 5 - 6 तासा पेक्षा मुलांचे कामाचे तास जास्त होणार नाही, या मुलांना ओवर टाइम मध्ये काम करणे, ओवर टाइम काम करण्या करता सक्ती करणे कायद्याने बंद करणे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या  बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.



हसने के लिये कुछ वाक्य !!!


पहली भेंट..नए-नए डॉक्टर ने अपने जीवन का पहला ऑपरेशन किया, लेकिन ऑपरेशन के थोड़ी ही देर बाद मरीज मर गया...
डॉक्टर ने दीवार पर टंगी काली मां की तस्वीर की ओर हाथ जोड़कर सिर झुकाते हुए पूरी श्रद्धा से कहा, "हे मां, मेरी ओर से यह पहली भेंट स्वीकार कीजिए..."

Saturday, December 5, 2009

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली



Sep 13, 11:54 am
मुजफ्फरपुर [गणेश कुमार मेहता]। राजेन्द्र कृषि विश्वविद्यालय वानिकी विभाग के वरीय वैज्ञानिक डा. आरएन झा के अद्यतन शोध ने वैज्ञानिक हलकों में जिज्ञासा पैदा कर दी है। उन्होंने बांस से बिजली बनाने की तकनीक इजाद की है। इंटरनेशनल जर्नल में प्रकाशित उनके आलेख ने जहां बायोमास [घास से बिजली] पर सबसे अधिक काम करने वाले चीनी वैज्ञानिकों का ध्यान आकर्षित किया है वहीं नेशनल थर्मल पावर कारपोरेशन ने भी उनसे तकनीक मांगी है। चीन में तो इस पर काम भी शुरू हो गया है। इधर, डा. झा अपने लैब में इसे विकसित करने में रात-दिन जुटे हुए हैं। कृषि के अलावा पावर सेक्टर में शोध कर रहे वैज्ञानिकों की नजर भी अब उन पर टिकी हुई है।

कई वर्षो से डा. झा की बांस से बिजली बनाने की तकनीकी लगभग अंतिम चरण में है। डा. झा ने बताया कि बायो इनर्जी में सबसे अधिक संभावना बांस में है। एक किलो बांस से एक घंटा में 15 सौ वाट बिजली पैदा की जा सकती है। बांस का औसतन उम्र पांच वर्षो का होता है। वह जितना पुराना होगा, उतनी अधिक बिजली पैदा की जा सकती है। इसके लिए उन्होंने बड़ा बक्सा के आकार की एक मशीन इनर्जी बायोसूट गैसफायर मशीन बनायी है। इसके अंदर 440 वोल्ट का ट्रांसफार्मर लगा हुआ है। इसमें बांस का बिस्कुट डाला जाता है। इस बाक्स को जेनरेटर पर चलाया जाता है। डा. झा के अनुसार यह ईधन के अन्य स्रोत से भी चलाया जा सकता है। बांस का बिस्कुट बनाने की भी मशीन बनायी गयी है। डा. झा ने बताया कि इस पद्धति से बिजली की लागत 1.35 रुपये प्रति यूनिट आयेगी। यह पद्धति पूरी तरह से प्रदूषण मुक्त होगी। डा. झा के अनुसार बांस कार्बन डाई-आक्साइड का सबसे बड़ा अवशोषक है। बांस की अधिक खेती कर पर्यावरण से कार्बन डाई-आक्साइड को कम किया जा सकता है। इंटरनेशनल जर्नल आफ बैम्बू में यह शोध रपट छपने के बाद बायोमास पर काम करने वाले वैज्ञानिकों ने इसे हाथोंहाथ लिया है। उन्होंने कहा कि इस दिशा में पहल कर किसानों के भविष्य को संवारा जा सकता है और ऊर्जा संकट से मुक्ति पाई जा सकती है





 




Thursday, December 3, 2009

It hurts a lot : (.


Wednesday, December 2, 2009

भारतीय नेत्याच्या भ्रष्ट्राच्यारा वर हकीम लुकमान कडेही ओषध मिळणार नाही,


लोकशाही म्हणजे जनतेचे , जनतेकरता , जनतेने निवडलेले सरकार.हि अब्राहीम लिंकन यांनी केलेली व्याख्या . पण भारतात जनतेने निवडून दिलेले सरकार, नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता, भ्रष्ट्र नेत्या कडून चालवले जाणारे सरकार म्हणजे लोकशाही अशी झालेली आहे. जो पर्यंत मताची खरेदी विक्री , धर्म , जातीपातीचे राजकारण कायद्याने बंद होत नाही तो पर्यंत हकीम लुकमान कडेही यावर ओषध मिळणार नाही,  आणि या करता  खुले जनमत घेण्या करता सरकारवर जनमताचा प्रचंड दबाब आणणे आवशक आहे.   








 

Monday, November 30, 2009

मग भारत सरकार नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,


आपल्या हद्दीतील बांधकाम चीन च्या  हरकतीं मुळे  बंद करण्यात आले या सारखी शरमेची गोष्ट दुसरी असु शकत नाही. चला आता आपले माननीय पंतप्रधान परत अमेरिकेला आम्ही आमच्याहद्दीत , आमच्या मालकीच्या जागेत काम करत होतो ही जागा आमच्या मालकीची आहे याचे अमेरिकन सरकारला पुरावे सादर करण्यास लवकरच भेट देतील. तो पर्यंत चीन त्या जागेचा ताबा घेईल . आणि मग भारत सरकार पंडित नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,

Saturday, November 28, 2009

१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे*



१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे* पण कॉंग्रेस पक्ष हा हज चा मुक्काम नाही. हे जेंव्हा यान्या समजेल तेंव्हायांचा पोपट झालेला असेल.
युतीच्या राज्यात सतेचा उन्माद उपभोगल्या मुळे , आज यांची अवस्था पंख छाटलेल्या जटायु सारखी झाली आहे'.

आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुखांनी पाळला नाही, यावरून  खरे दुखणे समजते.

Friday, November 27, 2009

वकील हे खोटे बोलण्या साठीच असतात,






आझमी हे न्यायालयात खोटे बोलत आसल्ल्या मुळे न्यायधीश संतप्त. वकील हे खोटे बोलण्या साठीच
असतात, हे माननीय न्यायधीशाना माहीत नाही याचे नवल वाटते.

Tuesday, November 24, 2009

                                            


गेले दशकभर जगात सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरड चालली आहे. विशेषत: मुंबईत २६ जुलै २००५ च्या न भूतो अशा प्रलयानंतर न भविष्यती करता काय करता येईल असा विचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला, हा एक स्तुत्य बदल समाजात अनुभवायला येऊ लागला आहे.  पाणी वाचवा, वीज वाचवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा पर्यायाने वसुंधरेला वाचवा तरच आपण वाचू अश्या मागण्या सुशिक्षित समाजात जोर धरू लागल्या आहेत.

अनेक छोटे छोटे बदल आपल्या राहाणीमानात करायला आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपणच ओरबाडलेल्या या वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम करता येईल

Saturday, November 21, 2009


IndiBlogger - The Indian Blogger Community

यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता


A domestic dog of any of various breeds commonly used for hunting, characteristically having drooping ears, a short coat, and a deep resonant voice

डॉक्टरांवरील हल्ले हा अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे.मुळातच हा कायदा चुक आहे. कट प्रॅक्टिस करून आजारी पेशंट ला लुबड्नाऱ्या डॉक्‍टरना शिक्षा करण्याऐवजी
यांच्या चुकी मुळे मरण पावलेल्या नातेवाईकाना शिक्षा हा अजब न्याय आहेआज मीडिया  हा धंदा झाला आहेधंढ्या बरोबर अनेक वाईट प्रवर्ती यात शिरल्यात . या वाईट  गोष्टीना शिक्षा करण्याची सरकारची हिम्मत नाही, हा हल्ला का केला याचा विचार केला तर सरकार ला नुकसान होईल . या मुळे सामान्य जनतेला जैल मध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करणे  सोपे.स्वातंञ्या नतर लोकशाही चे  रक्षण करायचे सोडुन मिडीयाच्या सहाय्याने लोकशाहीला बटिक करण्याचे कारस्थान  चालु आहेत्याला शिक्षा  कोण करणार???? हा मीडियाचा दहशदवाद पाकिस्तान पेक्षा घातक
आहे. समोरील चित्रातिल फोटो पाहिल्यास शिकारी कुत्रे बरे असे वाटल्यास नवल नाही. यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता. १०० दा खोटे बोला ते लोकाना खरे वाटते हा याचा सिध्ह्नत होता .येथे तर मिडिया घनट्या ला हजार वेळा खोटे बोलून, भड़क छ्याचित्रण दाखउन समाजात विष पेरत आहे.
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।



                                                                     

Wednesday, November 18, 2009

राज वर खटला भरण्या पेक्षा बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत

हिंदी ही कायद्याने भारताची राज्यभाषा नाही. तर ती फक्त सरकारी कामकाजची कार्यालयीन भाषा आहे. ते अफीशियल लॅंग्वेजस आक्ट, 1963 भारत सरकार च्या कायद्यात स्पष्ट केले आहे. केवळ उत्तर भारतात ही भाषा बोलल्या जाते. भारताच्या लोकसंख्ये पेकी फक्त ४०%लोकच ही भाषा बोलतात. तसेच कोर्टात हिंदी मजकूरात त्रुटी असतील तर इंग्रजी मजकूर मान्य केला जातो.
केन्द्र व राज्यात पत्रव्यवहार हिंदीत होतो. पण केन्द्र दक्षिणेतील राज्या बरोबर इंग्रजीत व्यवहार करते. हे महत्वाचे आहे. केंद्रीय मत्री शशी धरूर यानीच हे सत्य सांगितले आहे. यामुळे राज किंवा बाळासाहेबांचे काहीही चुक नाही. हिंदी नेत्यांच्या अतिरेका मुळे या देशाची तोडणी होईल  दक्षिण भारत आधीच दुरावला आहे व तो कडवा भाषवादी झाला आहे.
महाराष्ट्रा मुळे देशाचे तुकडे होणार नाही तर उत्तर भारतीयांच्या अरेरावीपणा,मुजोरपणा मुळे देशाचे तुकडे होतील. सर्वधर्म समभाव सर्वभाषा समभाव या चुकीच्या धोरणा मुळे या देशाचे जेव्हढे नुकसान झाले तेव्हडे नुकसान दहशतवादी हल्ल्या ने
झाले नाही. पण स्व:तला पुरोगामी म्हनून घेण्याच्या नादात मराठी पत्रकार व राजकारणी दिल्हीच्या खुर्ची ला सलाम नमस्ते करण्यात दंग आहे. गल्लीत गोंधळ दिल्हीत मुजरा असा हा प्रकार आहे. 

भूमीपूत्रारवर अन्याय करून परप्रांतीयाना नोकर्‍या द्या . असा कायदा भारतात नाही. राज वर खटला भरण्यापेक्षा    बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत. गेल्या
६० वर्षात स्वताच्य  राज्यात रोजगार निर्माण न करता देशाच्या इतर प्रांतात नोकर्‍या साठी जाउन तेथील शा'तता,कायदा खराब करण्या साठी दहशतवादी कारवाया केल्या बद्दल.याना  टाडा लावावा.





Monday, November 16, 2009

बाळासाहेबानीच कान टोचले, आणि मराठी मन मोकळे झाले


बाळासाहेबानीच कान टोचलेआणि मराठी मन मोकळे झाले. साडेतीन टक्के आता या विरुध ओरडतील. पण सत्य हे कटू असते ते सर्वजण बोलण्याची हिम्मत करत नाही. सलाम नंस्ते करण्यातच यांची जिंदगी जाते. दिल्हीच्या तख्ताला विरोध करणारा राणाप्रताप हा एकाच असतो. मराठी  वर्तमानपत्रांपासून  सचिन  दूरच  ... या वरुनच मराठी माणूसच मराठीचा शत्रु
आहे. हे समजते. हीच उच्चवर्णीय काम झाले की मराठी ची नाळ तोडतात.आपण मात्र आमचा आपला संपूर्ण अंक सचिनवरच काढणार आहे . दक्षिण कलाकार खेळाडु चा आदशॅ  घ्या. मागे ऊड्डाण पुला वरुन कलावंतानी  मुबईला वेठीस धरले होते.

Friday, November 13, 2009

मराठी बाणा



आग रामेश्वरी बंब सोमेश्‍वरी आसा हा प्रकार आहे. दक्षिण भारतात भाषिकवाद्यां समोर लोटांगण घालणारी काँग्रेस भाजपा, समाजवादी, लालू आणि उदारमतवादी पक्ष महाराष्ट्रात मात्र राजच्या मराठी बाण्या बद्दल ओरडत आहे. आणि सरकारही त्याला मदत करत आहे. भाषांतराची यंत्रणा बसविण्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीच बोलावे लागेल असे ठणकाउन का सांगत नाही.
राजचे पत्र जसेच्या तसे हे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कांना कोपर्‍या वर मोठ्या बॅनर च्या रूपात लावावे. नाहीतरी कणाहींन लाचर नेत्यांचे बॅनर पाहण्यापेक्षा हे पत्र पहिल्यावर मराठी मन जागे होई



Wednesday, November 4, 2009

महाराष्ट्रातील नेते कधी सुधारणार


 






वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन  काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.

Tuesday, November 3, 2009

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे

फक्त मराठीतूनच शपथ घ्यावी, हा आग्रह घटनाविरोधी असल्यांचंही अमरसिंह यानी म्हटलेअसे जर   असेल तर कर्नाटक च्या मंत्र्याने हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यला राजीनामा काद्यावा लागला.त्या वेळी ही समाजवादी पिल्लावळ गप्प का बसली. उत्तर भारतीयांच्या या अरेरावीला त्रासून दक्षिण भारतात हीनऽदीला पूणॅ बंदी आहेएव्हढेच नव्हे तर  
राष्ट्रीय प्रसारण हीनदी बाताम्याचे वेळी त्या लावता तमिळ बातम्या लावल्य जातात... ..  तेथे ही भयया मंडली  शेपुट घालतात .  प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रो नाही तर दुसर्‍या राज्यात जाऊन तेथील भूमीपुञा वर आरेरावी करणेत्यांच्या भावनांशी खेळणेहा देशढ्रो आहे.  

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे