स्वातंत्र्या कडून दहशतवादा कडे साठ वर्षे . स्वतंत्र भारताची वाटचाल .........
दहशतवाद शब्द आज लहान मुलास ही माहित झाला आहे. दहशतवाद म्हणजे केवळ परकीय देशाने अचानक हल्ला करून सामान्य जनतेस वेठीस धरणे नव्हे.शत्रू राष्ट्राचे ते तर हत्त्यार आहे.पण या दहाषदवादाचा दुरुपयोग करून राज्यकर्ते,नोकरशहा, व्यावसाइक स्वतः:च्या नागरिकांना वेठीस धरतात ते जास्त भयंकर धोकादायक आहे ,पण याच्या विचार होताना दिसत नाही. नेहमी common man च या दहाषदवादाचा बळी ठरला आहे. या दहशतवादात राजकारणी, नोकरशहा कधी बळी ठरला आहे का? कधीचः नाही. common man या अंतर्गत दहाषदवादास कसा-कसा बळी पडत आहे या बद्दल सविस्तर लवकर लिहीतच आहे ................
Translate
Wednesday, January 27, 2010
Thursday, January 21, 2010
ह्या सगळ्यावर सोप्पा उपाय आहे .. लोकांनी taxi वाल्यांशी मराठीतूनच बोलावे ..

महाराष्ट्र सरकारने रात्रीतून मराठी भाषा येणे आवशक आहे हा निर्णय फिरवला आणि मराठी माणुस चिडला . राजकर्ते कणाहीन आहेत , लाचार आहेत हें सिद्ध झाले आहे मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर बदद्ल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे हिंदी हि राष्ट्रभाषा नाही हे सत्य आहे
On 1/21/2010 3:28 PM Vitthal said:
हिंदी हि रस्त्राभाषा मुळीच नाही
Sunday, January 17, 2010
वर्तमान पत्रातील बातमी वाचून मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिया /Musharraf एकीकडे भारतात येऊन बासुंदी बिर्याणी झोडत होता
वर्तमान पत्रातील बातमी वाचून मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिय 54) खेड्या करता नव्हे तर शहरासाठी हि अश्या डॉक्टरची अत्यंत आवशकता आहे. आज हा धंदा पेशंट साठी नाही तर मेडिकल,विमाकंपन्या,डॉक्टर यांच्या नफ्या साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. 80% बिमारी साठी महागड्या उपचार पद्धतीची गरज नसते साधे उपचार चालतात पण हे सत्य लपवले जाते या महागड्या पद्धतीत सामान्य माणूस पिळला जात आहे हि भ्रष्ट साखळी मोडण्याची या निर्णयाने सुरुवात झाली आहे.हे चांगले. आता बुद्धिवादी डॉक्टर्स याला विरोध करतील पेशंटच्या जीवाशी खेळ चालला म्हणतील.हा कोर्स कमी किमतीचा डिप्लोमा टाईप कमी% करता असावा
READ MORE
READ MORE
Friday, January 8, 2010
मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने
मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने सारखेच आहेत. मनमोहंजी ये कॉंग्रेस का इमानदारिका मुखवटा आहेत. जसे मुंगेरीलाल ची स्वप्ने तुटत असतात आणि तो नवीन स्वप्ने पाहत असतो तसेच मनमोहंजी अमेरिकेच्या नीतीतून भारताच्या विकासाची स्वप्ने पाहत असतात ती मग महागाई च्या रूपाने तुटत असतात . तरी हे स्वप्ने पाहत राहतात अमेरिकन लोंब्बी ला ठोकर मारून भारतीयांच्या मातीचा विचार करणारा वित्तमंत्री,पंतप्रधान भारताला मिळत नाही तो पर्यंत फक्त इंडिया चाच विकास होईल आणि भारत उजाड होत राहील.आर्थिक विकास दर नऊ ते दहा टक्के राहील, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला. मात्र, याकडे बाजाराने दुर्लक्ष केले. कारण जनता मनमोहन, प्रणव मुखर्जी चीदामबारण सारखी मुंगेरीलाल के सपने पाहत नाही. जनता रोटी, कपडा मकान च्या विवंचनेत आहे. सरकारी पैशाने ५ स्टार हॉटेल मंत्र्या प्रमाणे ती राहत नाही. आणि common man चे प्रश्न या त्रिमुर्तीला काय माहित. common man पेक्षा अमेरिकन अणु कंपनी चा माल भारतात कसा विकला जाईल याची याची यांना चिंता असते
जय हो भारत भाग्य विधाता जय हो
Sunday, December 27, 2009
मार्केटिंग च्या या जगात, देवाच्या नावाखाली जनतेला लुबाडले जात आहे.आणि हे कटू सत्य सांगितले तर आमच्या श्रद्धेवर घाला घातला म्हणून (भक्त नाही) तर देवाचे दलाल ओरड करून सांगणाऱ्याचा निषेध करणार . धार्मिक स्थळे हि मोजमज्जा ( सभ्य भाषेत) करण्याची ठिकाणे झाली आहेत. अशी मंदिरे उभारून लोकांच्या अंधश्रद्धेचा गेरफायदा घेऊन गावोगाव हस्तक नेमून नवस केल्या वर कसा फायदा होतो याचा नियोजितपणे प्रचार केला जातो.भक्त येवू लागले म्हणजे मग पंचतारांकित सुखसोयी येतात, या सोयी आणि देव एकाच पकेज मध्ये मिळाल्यावर गर्दी होते. आपण कधी गंगा नदीवर गेला असाल तर आपणास याचा प्रत्यय येईल . पवित्र गंगेत स्नान करत असताना तेथील पुजारी आपल्या न कळत मोबाइल वर चित्रण करत असतात.देवाच्या पुजारयाला दलालाला ब्लैक मनी दिल्याशिवाय देवाचे दर्शन होत नाही. असे दर्शन त्या देवाला आवडत असेल का? शनि मागे लागला हें ऐक असेच भोळ्या जनतेला, भक्ताला फसवीण्याचे राजरोस साधन. शनिला देव मानल्या जाते.मग देव भक्ताला का परेशान करेल, त्रास देईल . याचा कोणी विचारच करत नाही. मग रोज हजारो किलो तेल वाया घालवले जाते. आणि गणिताचा विचार केला तर सेकंदाला ऐक भक्ताचे दर्शन झाले तर 86400 भक्ताचे दर्शन ही होत नाही, यात देवाच्या आरामाचा,पूजेचा वेळ पकडला नाही , देव 24 तास काम करतो हा हिशोब धरला.तर मग 24 तासात २ ते ३ लाख भक्त कसे दर्शन घेतात आपणच हिशोब करा .
Friday, December 25, 2009
आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!!,मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही ,

कोंबड कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच. त्या न्यायाने मुंबईचे कितीही मेकअप केले तरी मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही , हेच या पाण्याने दाखऊन दिले. आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!! त्याला अंधारात लोटून मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि राजकीय स्वार्थात मुलभूत सोई कडे दुर्लक्ष झाले. त्याचा हा परिणाम आहे.याला कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा तेव्हढीच जबाबदार आहे. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हाम्हारा..!! असा महानगर पालिकेत कारभार चालू आहे. या वर बोलणे हा गुन्हा आहे . आणि जे बोलतात तेही राजकीय फायद्या साठी . जनतेचे कोणालाही कांही देणे-घेणे नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्ना कडे लक्ष देण्या ऐवजी रेल्वे चा पाणी पुरवठा कमी करण्याचा महंमद तुघलकी निर्णय घेऊन सरकार आणि नोकरशाही मोकळी झाली आहे.या पेक्षा वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत . पंचतारांकित होटल चा पाणी पुरवठा कमी करावा.
भारतीय रेल्वे मध्ये सामान्य डब्ब्यात बसून या निर्णय घेनारया माणसांनी कधी प्रवास केला होता का? आधीच बकाल अस्वछ आसलेल्या डब्ब्यात नाक मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आत्मःहत्या कराव्यात हाच सरकारचा उद्देश असावा यामुळे लोकसंख्या ही कमी होईल. महाराजांच्या काळात असा निर्णय घेतला गेला असता तर ... महाराजांनी आख्या मंत्री मंडळा सह नोकरशाहीस हत्तीच्या पायाखाली शिरच्छेदाची शिक्षा दिली असती व अपील करण्याची पळवाट न देता ताबोडतोब अमंलात आणली असती . जय महाराष्ट्र !!!
Thursday, December 24, 2009
आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने.......


माझा भारत महान आहे.पण तो महान आजच्या 3 पेज वर चमकणाऱ्या क्रिकेट खेळाडू, फिल्मी नट-नट्या किंवा आपल्या राजकारणी नेत्या मुळे नव्हे, 100 स्रीया बरोबर लग्न करून प्रेमाचा आव आणणाऱ्या ताजमहल बांधणाऱ्या आणि काम झाल्यावर कारागिरांचे हात तोडणार्या राजा मुळे तर नव्हेच नव्हे .तर स्वर्गातून गंगा पृथ्वी वर आणणाऱ्या भगीरथ , अजिंठा , वेरूळ चे पहाड खोदून त्यावर नावाची साधी पाटी न लावता कर्म करणाऱ्या कारागीरा मुळे भारत महान आहे
महात्मा फुले. बाबासाहेब आबेडकर,योगी विवेकानंद , बाबा आमटे , मेधा पाटकर, आणि इतर अनाम अज्ञात सामान्य माणसा मुळे माझा भारत महान आहे. आज अश्याच एका अवलियाची गोष्ट आहे .बिहारी भारतीयाने आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने फोडून गावकऱ्या साठी बोगदा ३५० फूट लांब १६ फूट रुंद आणि १२ फूट उंच अशा आकाराचा कल्पनाही करू शकत नाही असा तयार केला.
Wednesday, December 23, 2009
असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असता तर हत्तीच्या पायाखाली चिरडले असते,
Is Maharashtra Govt hiding something?
भ्रष्ट नोकरशाही, मुजोर राजकारणी हे मुंबई वरील हल्ल्या कडे किती गंभीरपणे पाहत आहे हे स्पष्ट होते. बायो मेडिकल कचरा हा इतरवेळी रस्त्यात पडलेला असतो , तेंव्हा कोणी तो लवकर उचलत नाही. आणि आता आपल्या पापावर चादर टाकण्या साठी बायो मेडिकल कचरा हि शुद्ध थाप मारून वेळ मारून नेत आहे. असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असतातर महाराजांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री सकट सर्व पोलीस अतिमहत्वाच्या अधिकार्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, आणि त्यांची मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली असती. पण त्या काळात ...... असे कांही करण्याची शत्रूची हिम्मत झाली नसती.
भ्रष्ट नोकरशाही, मुजोर राजकारणी हे मुंबई वरील हल्ल्या कडे किती गंभीरपणे पाहत आहे हे स्पष्ट होते. बायो मेडिकल कचरा हा इतरवेळी रस्त्यात पडलेला असतो , तेंव्हा कोणी तो लवकर उचलत नाही. आणि आता आपल्या पापावर चादर टाकण्या साठी बायो मेडिकल कचरा हि शुद्ध थाप मारून वेळ मारून नेत आहे. असा प्रकार महारांजाच्या काळात झाला असतातर महाराजांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री सकट सर्व पोलीस अतिमहत्वाच्या अधिकार्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, आणि त्यांची मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली असती. पण त्या काळात ...... असे कांही करण्याची शत्रूची हिम्मत झाली नसती.
Friday, December 11, 2009
भारत रत्न विनायक दामोधर सावरकर भारतीय आदर्श
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
सरकारने जरी सावरकरांना भारत रत्न दिले नसले तरी वाईट वाटण्याचे कांही कारण नाही. आपण भारत रत्न ची यादी पहाल तेंव्हा;आपणस कळून येईल की J.R.D. टाटा आणि इतर 2 - 4 नावे सोडली तर सर्व नावे केवळ राजकीय फायद्या साठीच निवडली गेली आहेत. उद्वेगाची गोष्ट म्हणजे सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकराना स्वातंत्र्या नंतर ४३ वर्षांनी सरकारने नाईलाजाने जनमताच्या प्रखर दबाब मुळे गोंरवले. यामुळे आपणच सावरकरांना भारत रत्न हा संम्मान देऊ ; या करता या सरकारच्या परवानगीची गरज नाही
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
सरकारने जरी सावरकरांना भारत रत्न दिले नसले तरी वाईट वाटण्याचे कांही कारण नाही. आपण भारत रत्न ची यादी पहाल तेंव्हा;आपणस कळून येईल की J.R.D. टाटा आणि इतर 2 - 4 नावे सोडली तर सर्व नावे केवळ राजकीय फायद्या साठीच निवडली गेली आहेत. उद्वेगाची गोष्ट म्हणजे सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकराना स्वातंत्र्या नंतर ४३ वर्षांनी सरकारने नाईलाजाने जनमताच्या प्रखर दबाब मुळे गोंरवले. यामुळे आपणच सावरकरांना भारत रत्न हा संम्मान देऊ ; या करता या सरकारच्या परवानगीची गरज नाही
Subscribe to:
Posts (Atom)





